आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगूरला ‘जनराज्य’कडे तीन; सेनेस दोन समित्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - भगूर नगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्षा भारती साळवे व आरोग्य समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष शांताराम शेटे यांची निवड झाली. पाच विषय समित्यांपैकी तीन समित्या जनराज्य आघाडीकडे तर दोन समित्यांवर शिवसेनेच्या सदस्यांची वर्णी लागली.
तहसीलदार सुचेता भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका सदस्यांची विशेष बैठक सभागृहात झाली. संख्याबळाच्या आधारावर सत्ताधारी आघाडीला तीन, तर विरोधी शिवसेनेला दोन समित्या प्राप्त झाल्या.
स्थायी समितीच्या सदस्यपदी उपनगराध्यक्ष शेटे, चेतन बागडे, प्रतिभा घुमरे, रामनाथ कासट, रफत शेख यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी चेतन बागडे, सदस्यपदी दीपक बलकवडे, शैलजा कापसे, अंबादास कस्तुरे, अनिता करंजकर; शिक्षण समिती सभापतिपदी प्रतिभा घुमरे, सदस्यपदी रघुनाथ साळवे, संजय पवार, गोरखनाथ बलकवडे, स्वाती झुटे; आरोग्य समिती सदस्यपदी दीपक बलकवडे, संगीता कासार, रघुनाथ साळवे, अंबादास कस्तुरे; पाणीपुरवठा समिती सभापतिपदी रामनाथ कासट, सदस्यपदी विजय करंजकर, संजय शिंदे, शोभा भागवत, संगीता कासार; महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी रफत शेख, सदस्यपदी स्वाती झुटे, शैलजा कापसे, स्मिता गणोरे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण टोपले, नगरअभियंता जगदीश पाटील, नीलेश बाविस्कर, सुभाष जाधव, संजय पेखळे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.