आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका अधिकाऱ्यांचा अायुक्तांनाही गुंगारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महासभा,स्थायी समिती असाे की प्रभाग समिती सभा, नगरसेवकांना नानाविध कारणे पुढे करून माहिती देण्यासाठी टाेलवाटाेलवी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अाता चक्क अायुक्तांनाही साेडले नसल्याची बाब उजेडात अाली अाहे. मासिक बैठकीत अधिकारी अपूर्ण माहिती अाणून वेळकाढूपणा करीत असल्याचे लक्षात अाल्यावर अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी शिस्तभंगाचे अस्त्र उगारले अाहे.

वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अाता काेणाचे भय उरले नसून, त्यामुळेच की काय अधिकारी सर्रास महासभा, स्थायी समिती सभेत नगरसेवकांची दिशाभूल करताना दिसत अाहेत. अाता याच अधिकाऱ्यांनी अायुक्तांनाही गुंगारा दिल्याची बाब उजेडात अाली अाहे. अनेक अधिकाऱ्यांनी अाढावा बैठकीत चुकीची माहिती सादर करून दिशाभूल करणे सुरू केले अाहे. विषयाची टिप्पणी तयार करणे, अभ्यास करता बैठकीला येणे, अाकडेवारीत गाेंधळ असे प्रकार सुरू झाल्याने अायुक्त मेटाकुटीला अाले. अधिकाऱ्यांच्या या चालबाजीमागील अर्थ लक्षात घेत त्यांनी कठाेर पावले उचलली अाहेत.

यापुढे काम करा, नाही तर कारवाई
अायुक्तांनीनियमावली तयार करून त्यानुसारच बैठकीला तयारीनिशी हजर राहण्याचे फर्मान काढले अाहे. विषयाची परिपूर्ण माहिती, सादरीकरण घेऊन बैठकीला वेळेपूर्वी हजर राहणे तसेच एक दिवस अाधी अायुक्तांना तयारीबाबत कल्पना देणे बंधनकारक अाहे. विषयांची माहिती किमान १० प्रतींत उपलब्ध ठेवावी लागणार आहे. या सूचनांचे पालन झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून, तसे पत्रच अायुक्तांनी काढले अाहे.
बातम्या आणखी आहेत...