आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या पोलवरही झळकणार ‘भाऊ-दादा’, जाहिरातीचा ठेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : अार्थिक खस्ता खाणाऱ्या महापालिकेने अाता मिळेल त्या बाबीतून उत्पन्न काढण्याची धडपड चालवली असून, जाहिरातीद्वारे काेट्यवधी रुपयांच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी साेडले जात असल्याचे बघून अखेर विद्युत खांबावर जाहिरातींना परवानगी देत महसूल मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला अाहे. स्थायी समितीवर निविदा पद्धतीने तीन वर्षांसाठी नाशिक पूर्व पश्चिम या परिसरातील ६०६ पाेलवर जाहिरातीसाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी अाला अाहे. 
 
महापालिकेची अार्थिक स्थिती नाजूक असून, गेल्या काही वर्षांपासून अंदाजपत्रकात गृहीत धरलेले उत्पन्न मिळवण्याची मारामार अाहे. अायुक्तांचेच अंदाजपत्रक कागदावर राहत असल्यामुळे स्थायी महासभेची वाढ तर हवेतच असल्याचे चित्र अाहे. दरम्यान, महापालिकेला उत्पन्न वाढवणे अपेक्षित असताना गेल्या काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाही. अाता अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी उत्पन्नाची घडी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहे. 
 
महापालिका क्षेत्रात जाहिरातीद्वारे उत्पन्न मिळवण्याचा माेठा स्रोत अाहे. महासभेत तज्ज्ञ अभ्यासू नगरसेवकांनी वेळाेवेळी गृहीतकाद्वारे दाेनशे ते अडीचशे काेटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न जाहिरातीद्वारे मिळू शकते हेही पटवून दिले. मात्र, जाहिरात धाेरण संमत करून शासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठविण्यापलीकडे काहीच झाले नाही. 
 
दरम्यान, उत्पन्न मिळाले नाही तर नाेकरभरती साेडा, मात्र साधी किरकाेळ कामे करणे येत्या काळात अवघड हाेणार असल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला अाहे. त्यातून विद्युत खांबावर जाहिरातीसाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.
 
महापालिकेच्या सहाही विभागांत माेक्याच्या रस्त्यावरील विद्युत खांब लक्षात घेत त्यावर जाहिरात करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून देकार मागवण्यात अाले. त्यात केवळ नाशिक पूर्व पश्चिम विभागातूनच सर्वाधिक देकार अाले असल्यामुळे येथे जाहिरातीसाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव अाला अाहे. 
 
सातपूर, सिडकाे, पंचवटी नाशिकराेड भागात मात्र जाहिरातीसाठी संस्थांकडून प्रतिसाद नसल्यामुळे येथे फेरनिविदा काढव्या लागणार अाहेत. दरम्यान, नाशिक पूर्व विभागातील पाेल २३१, तर नाशिक पश्चिममध्ये ३७५ पाेलवर बाय चे जाहिरात फलक लावता येणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...