आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या दाेन हजार गाळ्यांची पाेटभाडेकरू शाेधासाठी तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेला नाममात्र भाडे देऊन व्यापारी संकुलात पाेटभाडेकरूंद्वारे दुप्पट, तिप्पट पैसे कमवणाऱ्यांना जाेरदार दणका देणारे अाॅपरेशन राबवून अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी एकाच दिवसात जेमतेम एकाच तासात तब्बल दाेन हजार गाळ्यांची तपासणी केली. कमालीची गाेपनीयता राबवत एका कार्यशाळेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कालिदास कलामंदिरात एकत्र केले गेले अचानक फाेन बंद करण्याचे अादेश देऊन माेहिमेवर धाडून शक्य तितके माेठे मासे शाेधण्याचा प्रयत्नही झाला.
पालिकेच्या व्यापारी संकुलातील पाेटभाडेकरूंचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत अाहे. मध्यंतरी स्थायी समिती सभेत पाेटभाडेकरू शाेधण्याबाबत सदस्यांनी मागणी केली. प्रत्यक्षात वर्ष उलटल्यानंतरही कारवाई हाेत नव्हती. अशातच गाळ्यांच्या अन्यायकारक रेडीरेकनरवरून पदाधिकारी अाक्रमक झाले असताना प्रशासनाने तितक्याच तत्परतेने गाळ्यांच्या नावाखाली
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील पालिकेच्या गाळ्यांची तपासणी केली. सायंकाळपर्यंत ही माेहीम राबविण्यात अाली.

दहा दिवसांत हाेणार गाळ्यांबाबत फैसला
या माेहिमेची फलनिष्पत्ती दहा दिवसांनी समजेल, असे अायुक्त गेडाम यांनी सांगितले. दुकान काेणाचे, शाॅप अॅक्ट काेणाचे, दुकानावरील फलक, त्यावरील प्राेप्रारायटरचे नाव, माेबाइल क्रमांक, लॅण्डलाइन क्रमांक, पावतीपुस्तक अादींची माहिती गाेळा केली असून, २२ संगणकांत सायंकाळपर्यंत दुकाननिहाय माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू हाेते. पाेटभाडेकरूंद्वारे धंदा थाटणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करून चाेख उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचेही मानले जात अाहे. पालिका प्रशासनाने पालिकेच्या ५८ व्यापारी संकुलात ६८ पथकांद्वारे १९७३ गाळ्यांची तपासणी केली. प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन गाळ्यांची तपासणी करण्याचे नियाेजन हाेते. या कर्मचाऱ्यांवर पालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, विभागीय अधिकारी, सहाय्यक अायुक्त अन्य खातेप्रमुखांचे नियंत्रण हाेते. पंधरा व्यापारी संकुले संवेदनशील असल्यामुळे तपासणीसाठी ६३ सुरक्षारक्षक ३१ पाेलिस कर्मचारी दिमतीला हाेते.

पालिका गाळ्यातील पाेटभाडेकरूंचा शाेध घेण्यासाठी सर्वप्रथम अशी तारीख निश्चित करण्यात अाली की, ज्या दिवशी तेथील कामकाज बंद असणार नाही. त्यानुसार साेमवार अंतिम झाल्यावर अायुक्तांनी काेणालाही थांग लागू देता नियाेजन केले. माेहिमेच्या तीन दिवस अाधी एका कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे फर्मान काढण्यात अाले. कार्यशाळा कशाची याबाबत चर्चा सुरू झाल्यावर मग स्मार्ट सिटीचे नाव देण्यात अाले. त्यानिमित्ताने जवळपास अाठशे कर्मचारी एकत्र जमल्यानंतर अायुक्तांनी प्रत्येकाला साेशल मीडियाद्वारे काेण काेण अॅलर्ट असते, याबाबत विचारले. त्यानंतर कल लक्षात घेत माेबाइल बंद करण्याची सूचना दिली. जेणेकरून अाॅपरेशन जाहीर केल्यानंतर त्याची माहिती काेठेही पसरू नये. त्यानंतर अायुक्तांनी १७ मुद्यांचा अंतर्भाव असलेली प्रश्नावली तयार करून कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांना काेणता गाळा तपासायचा, याबाबत थेट माहिती नव्हते. त्याची यादी अायुक्तांनी खातेप्रमुखाला दिली त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे शक्य तितकी गाेपनीयता ठेवण्याचा प्रयत्न झाला.

..दहा दिवसांत फैसला
या माहितीचे विश्लेषण करून त्यातून पाेटभाडेकरू काेण याचा छडा लावला जाईल, असा विश्वास अायुक्तांनी व्यक्त केला. काही ठिकाणी पालिकेला पाेटभाडेकरू अाढळले असून, काही ठिकाणी चक्क पालिकेचे दाेन गाळे एकत्र करून धाेकेदायक बदल केल्याचे समाेर अाले अाहे. संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. पाेटभाडेकरू सापडल्यास कारवाई करण्याबाबत करारनाम्यातील नियमांचा अाधार घेतला जाणार अाहे. दरम्यान, पालिकेची माेहीम असल्याचे समजताच अनेकांनी दुकाने बंद केली. काहींनी मालकी सांगण्याचा प्रयत्न केला.

दबावतंत्राचा संशय, अायुक्तांकडून खंडन
सध्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांना रेडीरेकनरनुसार भाडे अाकारणीचा विषय चर्चेत अाहे. पालिकेने चुकीची भाडेवाढ केल्याचे मान्य करून सुधारणा करण्याचे संकेत दिले हाेते. महासभेत तसा प्रस्ताव ठेवण्याच्या महापाैरांच्या सूचना हाेत्या. या पार्श्वभूमीवर १६ जून राेजी हाेणाऱ्या महासभेत गाळ्यांचा विषय चर्चेत येण्याची शक्यता अाहे. त्यामुळे त्याला पाेटभाडेकरू शाेधमाेहिमेद्वारे उत्तर देण्याबराेबरच दबावतंत्राचाही एक भाग असल्याचा कयास नगरसेवक खासगीत व्यक्त करीत हाेते, मात्र अायुक्तांनी त्याचे खंडन करीत अनेक दिवसांपासून ही माेहीम राबवण्याचा मनाेदय असल्याचे सांगितले. पालिकेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विषय असल्यामुळे त्यातून प्रामाणिक गाळेधारकांचे नुकसान हाेणार नाही, असा चिमटा घेतला.