आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Swimming Pool Will Begin The Morning Now

महापालिकेचे जलतरण तलाव आता सकाळीच राहणार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेने पाणीकपात जाहीर केल्यानंतर अाता स्वत:च्या अखत्यारीतील पाचही जलतरण तलावांत सकाळच्या सत्रातच पाेहण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. दरम्यान, एेन सुटीत जलतरण एकच वेळ तरणतलाव सुरू राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांबराेबरच जलतरणपटूंची निराशा झाली अाहे. दिवाळीच्या सुटीची गर्दी एकत्रित येणार असल्याने सकाळच्या सत्रात सर्वच तरणतलाव गर्दीने अाेसंडून वाहण्याची चिन्हे अाहेत.

महापालिकेतर्फे शहरात सहा ठिकाणी जलतरण तलाव उभारण्यात अाले असून, या सहाही तरण तलावांवरील सायंकाळचे सत्र पाणीकपातीमुळे बंद करण्यात अाले अाहे. बहुतांश तरणतलावांमध्ये सकाळच्या सत्राइतकीच गर्दी सायंकाळच्या सत्रातही असते. त्यातील बहुतांश नागरिक अाता सकाळच्या वेळेत जलतरणासाठी येणार असल्याने त्यांची सकाळच्या सत्रातच गर्दी हाेणार अाहे. सकाळच्या सत्रात शाळा असणाऱ्या बालगाेपाळांना सायंकाळचाच वेळ माेकळा मिळत असल्याने त्यांची गर्दी त्याच वेळेत जास्त असते. मात्र, अाता महापालिकेच्या पाणीकपातीच्या निर्णयामुळे अनेक बालकांना पाेहण्याच्या अानंदाला मुकावे लागणार असल्याने अनेक बालकांनी, तसेच त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली अाहे.

सुटीमध्ये होणार गैरसाेय
दिवाळीच्या सुटीच्या काळात नियमित जलतरणपटूंच्या तुलनेत ट्रॅकवर येणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढत असते. त्यामुळे यंदाही दिवाळीच्या सुटीत वाढणारी ही संख्या कशी हाताळायची, असा प्रश्न अातापासूनच जलतरण तलावांच्या व्यवस्थापनाला सतावू लागला अाहे. अाधीच अत्यल्प मनुष्यबळासह एकेक सत्र पार पाडत असताना एकाच वेळी वाढू शकणारे दुप्पट लाेंढे काेणत्या प्रकारे हाताळायचे, हा माेठा पेच निर्माण झाला अाहे.

जलतरण तलावांमधील पाणी हे नित्यनेमाने फिल्टरद्वारे रिसायकल केले जात असल्याने त्यातील पाणी अगदी महिन्यांनी बदलले जाते. मात्र, टँकमध्ये उतरण्यापूर्वी अाणि स्नान झाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या वाॅशला दरराेज सर्वाधिक पाणी लागते. त्यामुळेच पाणीकपातीचा फटका टँकलादेखील बसला अाहे. नाशिकराेड, सिडकाे, सातपूरचे तरणतलाव यापूर्वीच एकवेळ करण्यात अाले अाहेत, तर शनिवारपासून सावरकर जलतरण तलाव पंचवटीतील तरणतलावही केवळ सकाळच्या सत्रातच सुरू राहणार अाहेत.

सायंकाळी स्पेशल बॅचची मागणी
सायंकाळी जलतरण तलाव बंद राहणार असला, तरी स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या जलतरणपटूंसाठी सात ते अाठ या कालावधीत स्पेशल बॅच घेण्याची मागणी क्रीडा संघटनांकडून शाळांकडून अाली अाहे. या पार्श्वभूमीवर अायुक्तांशी बाेलून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी सांगितले.