आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुक्तांच्या वॉर्डरचनेवर विभागीय अायुक्तांची माेहाेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अायुक्तांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावावर विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने काेणताही फेरबदल करता शिक्कामाेर्तब केला असून, अापला अहवाल राज्य निवडणूक अायाेगाकडे साेमवारी (दि. १२) मान्यतेसाठी पाठविला. प्रभागरचना तयार करताना नैसर्गिक अाणि मानवनिर्मित सीमांचा विचार करतानाच जुन्या वाॅर्डरचनेत फारसा फेरबदल करण्याचे धाेरण अवलंबिण्यात अाल्याचे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
येत्या फेब्रुवारीत हाेणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक अायाेगाने अधिसूचना जारी केली असून, सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभागरचना करून विभागीय अायुक्तांकडे पाठवण्याचे बंधन घातले हाेते. त्यानुसार महापालिकेने समिती स्थापन करून प्रभागरचनेचे काम पूर्ण केले. त्यानंतर प्रारूप प्रभागरचना अाराखडा गेल्या बुधवारी (दि. ७) विभागीय अायुक्त एकनाथ डवले यांना सादर करण्यात अाला हाेता. डवले यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून या प्रस्तावित प्रारूप अाराखड्याबाबत अभ्यास केला गेला. मात्र, त्यात काेणतेही फेरबदल करता त्यावर समितीने शिक्कामाेर्तब केल्याचे पालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले. हा अहवाल अाता राज्य निवडणूक अायाेगाकडे पाठविण्यात अाला अाहे. या प्रारूप अाराखड्यात लाेकसंख्येच्या घनतेनुसार हे वाॅर्ड बनवण्यात अाले अाहेत. प्रत्येक प्रभागामध्ये सुमारे ४३ ते ४५ हजार मतदार असतील. त्या हिशेबाने १४ लाख ८४ हजार लाेकसंख्येच्या हिशेबाने सुमारे ३१ प्रभाग करण्याचा हा प्रस्ताव अाहे.

प्रभाग असतील
{ प्रगणक गट काेठेही खंडित हाेणार नाही याची घेतली काळजी
{ नदी, टेकडी, माेठी शेती अशा नैसर्गिक सीमा लक्षात घेऊन तयार केला प्रारूप अाराखडा
{ रस्ते, महामार्ग अशा मानवनिर्मित सीमांचाही झाला विचार
{ जुन्या वाॅर्डरचनेची सीमा कमीत कमी विस्कळीत करण्याचा प्रयत्न
{ ४३ हजार ते ५३ हजारांच्या दरम्यान लाेकसंख्येचा एक प्रभाग
{ एका प्रभागात ९० ते १५० पर्यंत प्रगणक गट
फेब्रुवारीतहाेणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ सप्टेंबरपासून मतदार नाेंदणी अभियान सुरू हाेत असून, प्रत्येक प्रभागात यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार अाहे. याशिवाय, शहरातील १५ महाविद्यालयांमध्येदेखील मतदार नाेंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत दिली. जानेवारी २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना यंदा मतदानाचा हक्क प्राप्त हाेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार नाेंदणी केली जात नाही, तर विधानसभेसाठी तयार करण्यात अालेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी यासाठी म्हणून वापरली जाते. म्हणजेच विधानसभेच्या मतदार यादीत नाव असलेल्यांना महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येते. भारत निवडणूक अायाेगाने १५ सप्टेंबर ते १४ अाॅक्टाेबर या कालावधीत विधानसभा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतलेला अाहे. या संधीचा फायदा घेत प्रभागातील अधिकाधिक पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत राज्य निवडणूक अायाेगाने निर्देश दिले अाहेत. त्यानुसार विशेष जनजागृती माेहीम राबविण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी सांगितले.

दवंडी पिटली जाणार : मतदारनाेंदणी अभियानाविषयी जागृती वाढावी, या उद्देशाने प्रभागा-प्रभागात दवंडी पिटली जाणार अाहे. तसेच, चित्ररथ फिरवून ध्वनिक्षेपकांद्वारे अभियानाची माहिती जनतेपर्यंत पाेहोचविली जाणार अाहे.

{ गणेश मंडळांमार्फत केली जाणार मतदान जागृती { गणपती विसर्जन स्थळांवर वाटले जाणार जागृतीविषयक पत्रके, {लाेकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा असणार अभियानात सहभाग { शहर बसेसमध्ये ध्वनिफितीव्दारे प्रचार करणार { चित्रपटगृह, रेडिअाे, साेशल मीडियामार्फतही केली जाणार जागृती { बचतगट सदस्यांमध्येही राबविली जाणार माेहीम { पालिका घेणार स्वयंसेवी संस्थांची मदत { गॅस सिलिंडरवर स्टिकर लावले जाणार { मदत केंद्रासह अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणार

युवकांचा सहभाग वाढविणार
^देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात अाहे, असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर मतदार नाेंदणीत युवक वर्गाने अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे अामचे प्रयत्न अाहेत. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, महापालिका

कविता राऊत ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
नाशिक महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी अांतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. कविताने काेणताही अार्थिक माेबदला घेता हे काम करण्यास संमती दिली अाहे. केवळ मतदार जागृतीच्या फलकांवर तिचा फाेटाे वापरता ठिकठिकाणी हाेणाऱ्या जागृतीच्या कार्यक्रमात तिला निमंत्रित करण्यात येणार अाहे. याशिवाय, मतदान वाढविण्यासाठीदेखील तिच्या माध्यमातून जागृती करण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...