आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर यंत्रणा बंद झाल्याने जागोजागी कच-याचे ढिगारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्याघंटागाडी योजनेमुळे कचरा संकलन करण्यात मदत होत असली तरी वाढत्या शहरीकरणामुळे ठिकठिकाणी कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी, यासाठी शहरातील बहुतांश प्रभागांत महापालिकेच्या वतीने ट्रॅक्टरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
मात्र, नोव्हेंबरपासून ट्रॅक्टरची ही यंत्रणा बंद करण्यात आल्याने कचऱ्याची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
सध्या डेंग्यूसह साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असतानाच, ही यंत्रणा बंद केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत तत्काळ स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याने ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी केली जात आहे.
ज्या प्रभागात अधिक मोकळे भूखंड आहे, तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा विस्तार आहे, अशा प्रभागांमध्ये बांधकाम विभागाच्या अंतर्गत ट्रॅक्टरची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. शहरातील बहुतांश प्रभागात अनेक दिवसांपासून ट्रॅक्टर सुरू होते. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्त्यांवरची माती, मोकळ्या भूखंडावरील माती दगड, झाडा-झुडुपांचा पालापाचोळा, दुभाजकालगतची स्वच्छता, मोठ्या कचराकुंड्या अशा प्रकारची कामे केली जात होती. त्यामुळे जेथे घंटागाडी पोहोचू शकली नाही, त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वच्छता राखणे शक्य होत होते. परंतु, ही यंत्रणाच बंद झाल्याने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे अस्वच्छता पसरू लागली आहे. मोकळे भूखंड डपिंग ग्राउंड बनत चालल्याने ट्रॅक्टर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
कचरा संकलनात ट्रॅक्टरची मोठी मदत
घंटागाडीच्यामाध्यमातून कचरा संकलित केला जात असला तरी ठिकठिकाणी मातीेचे ढिगारे, मोकळ्या भूखंडावरील घाणीचे साम्राज्य यांसह नागरिकांच्या तक्रारी आल्यास तत्काळ स्वच्छता राखण्यास ट्रॅक्टरची मोठी मदत होते. त्यामुळे ट्रॅक्टर पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. -अर्चना जाधव, नगरसेविका
नागरिकांच्या तक्रारी; ट्रॅक्टर पुन्हा सुरू करण्याची मागणी
महापालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत शहरातील बहुतांश प्रभागात ट्रॅक्टरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. एका ट्रॅक्टरवर तीन ते चार कर्मचारी राहातात. रस्त्यावरील माती दगड, मोकळे भूखंड, झाडा-झुडपांचा पालापाचोळा उचलून स्वच्छता राखली जाते.