आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चे कंपनी करणार उद्यानांत सुटीची धमाल, ३६ उद्यानांमध्ये दिल्या सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उद्यानांची रखडलेली कामे अाणि महापालिकेकडे असलेला निधीचा अभाव यामुळे एेन सुटीत बालगाेपाळांच्या अानंदावर विरजण पडण्याची वेळ अाली अाहे. दिव्य मराठी’ डी. बी. स्टारच्या माध्यमातून बुधवारीच यावर प्रकाशझाेत टाकण्यात अाला हाेता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील ३६ उद्यानांमध्ये साेयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, या उद्यानांमध्ये जाऊन मनसाेक्त अानंद लुटण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
एेन सुटीत बालगाेपाळांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधल्यानंतर महापालिका प्रशासनाने उद्यानांमध्ये सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली.
शहरातील उद्यानांच्या अवस्थेवर "डीबी स्टार'ने टाकलेला प्रकाश.

पंचवटी
{कृष्णनगर उद्यान
{ प्रमोद महाजन उद्यान (सरस्वतीनगर)
{ कलानगर उद्यान
{ ओमनगर उद्यान
{ जाधव कॉलनी उद्यान
{ ढिकलेनगर उद्यान
{ हनुमाननगर उद्यान
सिडकाे विभाग
{सुभाषचंद्र बोस उद्यान { गणेश चौक बालउद्यान { कालिका पार्क { वनश्री कॉलनी उद्यान { विघ्नहर्ता उद्यान { गोपाळकृष्ण उद्यान { दुर्गानगर उद्यान
सातपूर विभाग
{गणेशनगर उद्यान { राज्य कर्मचारी सोसायटी उद्यान { शिवनेरी उद्यान { पामस्प्रिंग उद्यान { सावरकरनगर (गणपती मंदिर) उद्यान
नाशिक पूर्व विभाग
{सिटी पार्क { सावता माळी उद्यान { कल्पतरू उद्यान { शीतल गार्डन { मातोश्री उद्यान
नाशिक पश्चिम विभाग
{शिवाजी उद्यान { नेहरू उद्यान { रामदास कॉलनी उद्यान { प्रमोद महाजन उद्यान { राका कॉलनी उद्यान
नाशिकरोड विभाग
{सोमाणी उद्यान { पार्वताबाईनगर उद्यान { दुर्गा उद्यान { लोकमान्यनगर उद्यान { आडकेनगर क्र. उद्यान { सह्याद्रीनगर उद्यान { आनंदनगर उद्यान (डॉ. कातोरे निवास स्थानामागे)