आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादेशाच्या अर्थाचा अनर्थ अन‌् पथदीपांचा प्रकाश व्यर्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील बहुतांश झाडे ही धाेकादायक ठरत अाहेत. त्यामुळे वाहनधारकांना अाणि रहिवाशांना त्रासदायक ठरत असलेली झाडे काढून त्याचे पुनर्राेपण करण्याचे काम सध्या महापालिकेने हाती घेतले अाहे. त्यामुळे नागरिकांना माेठा दिलासा मिळणार असला, तरी प्रमुख रस्ते अाणि उपरस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फाद्यांचा विषय एेरणीवर अाला अाहे. शहरातील रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे पथदीप झाकले जात असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशाला समाेरे जावे लागत अाहे. शहरातील गंगापूर, पंपिंग स्टेशनराेड, रामेश्वरनगर, गुलमाेहर काॅलनी, सिडकाे, उपनगर, द्वारका, चांडक सर्कल ते गाेल्फ क्लब, सारडा सर्कल ते महामार्ग बसस्थानक, हिरावाडी, पंचवटी अशा अनेक परिसरातील पथदीप झाडांच्या फांद्यांमुळे झाकले गेले अाहे. याशिवाय बहुतांश रस्त्यांवर छाेटे-माेठे खड्डे पडले अाहेत. त्यातच रस्त्यावर पुरेसा प्रकाश येऊ शकत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळते. यासंदर्भात बहुतांश नागरिकांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार लेखी अर्ज अाणि तक्रारीदेखील सादर केल्या अाहेत. परंतु, तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांना अाजही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत अाहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांच्या अाणि वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेता झाडांच्या फांद्यांत झाकाेळलेले पथदीप तातडीने माेकळे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली अाहे.
न्यायालयाच्याअादेशाचा अाधार घेत महापालिकेकडून टाळाटाळ
रस्त्यांवर अपुरा प्रकाश पडत असल्याने गुन्हेगारीच्या अाणि अपघातांच्या घटना घडत अाहेत. अशा वेळी पथदीपांना झाडांच्या विळख्यातून माेकळे करणे गरजेचे असताना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मात्र न्यायालयाकडून फांद्या छाटण्यास बंधन घालण्यात अाल्याचे सांगून स्पष्टपणे टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत अाहे.

नागरिकांना चउलट नाेटिसा
पथदीपांवरअालेल्या फांद्या ताेडण्यासाठी स्थानिक नागरिकच अाता पुढाकार घेऊ लागले अाहेत. पथदीपाला अडथळा ठरणाऱ्या फांद्या खासगी लाेकांना बाेलावून ताेडल्या जाऊ लागल्या अाहेत. परंतु, महापालिका अशा लाेकांनाच नाेटिसा बजावून जाब विचारू लागली असल्याच्या तक्रारी अाहेत. त्यामुळे फांद्या ताेडूही देत नाही अाणि ताेडतही नाहीत, अशा भूमिकेतील प्रशासनामुळे अडचणीत भर पडत अाहे.

उच्च न्यायालयाच्या अादेशाचा चुकीचा अर्थ
^सिंहस्थकुंभमेळ्यातझाडांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या अादेशात असे काेठेही म्हटलेले नाही की, झाडांच्या फांद्या ताेडू नये. परंतु, महापालिकेने या अादेशाचा चुकीचा अर्थ काढला असून, न्यायालयाच्या अादेशानुसार फांद्या ताेडू शकत नसल्याचे कारण पुढे केले जात अाहे. पथदीपांवर झाडांच्या फांद्या अाल्याने पुरेसा प्रकाश मिळत नसल्याने नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत असून, चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात वाढ हाेऊ लागली अाहे. त्यामुळे अशा फांद्या तत्काळ छाटाव्यात. - विक्रांत मते, अध्यक्ष,दक्षता अभियान

अनिल चव्हाण, अतिरिक्तअायुक्त, मनपा
तारा भूमिगत व्हाव्या
^सिडकाेपरिसरात लाेंबकळणाऱ्या विद्युततारा, जीर्ण अन‌् वाकलेले िवद्युत खांब यांसह विजेच्या समस्या नेहमीच भेडसावतात. उघड्यावरील विद्युततारा भूमिगत केल्या गेल्यास दुर्घटना टळतील. तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या ताेडणे गरजेचे बनले अाहे. - प्रवीण अाव्हाड, रहिवासी,सिडकाे

लाखाे रुपये पाण्यात
शहरातील पथदीपांवर झाडांच्या फांद्या अाल्याने पुरेसा प्रकाश मिळणे दुरापास्त झाले अाहे. या पथदीपांचा नागरिकांना काेणत्याही प्रकारचा फायदा हाेत नसून वीज वाया जात अाहे. फायदा तर नाही केवळ वीजबिल भरायचे काम सध्या महानगरपालिकेचे सुरू असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात अाहे.

दक्षता समितीकडून निवेदन; मात्र तरीही प्रशासनाचे दुर्लक्षच
पथदीपांवर झाडांच्या फांद्या अाल्यामुळे पुरेसा प्रकाश जमिनीवर पडत नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले अाहेत. पथदीपांचे महत्त्व लक्षात अाणून देत पथदीपांवर अालेल्या फांद्या तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे दक्षता समितीने महानगरपालिकेकडे केली अाहे. मात्र, त्यावर अद्याप काेणतीही दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नसल्याने अाजही िकत्येक भागांत ही समस्या कायम अाहे.

जीवघेण्या विद्युततारांकडेही दुर्लक्ष
शहरात अनेक ठिकाणी विद्युततारा झाडांच्या विळख्यात सापडल्या अाहेत. पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी विद्युततारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या महापालिका प्रशासनाने महावितरण कंपनीच्या मदतीने काढणे गरजेचे अाहे. केवळ पावसाळ्यापूर्वीच नव्हे, तर सातत्याने अशा अडचणीच्या ठरणाऱ्या फांद्यांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे अाहे. प्रत्यक्षात मात्र तसे हाेत नसल्याने अनेक फांद्या विद्युततारांवर पडून अनेकवेळा जीवितहानीसह शाॅर्टसर्किट झाल्याने अाग लागण्याच्या घटना घडल्या अाहेत. असे असतानादेखील शहरातील अनेक परिसरात ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने पाहणी केली असता विद्युततारा फांद्यांच्या विळख्यात अडकलेल्या दिसून अाल्या. विशेष म्हणजे, कित्येक महिन्यांपासून अशा फांद्यांकडे महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्षही नसल्याच्या तक्रारी अनेकांनी प्रतिनिधीकडे केल्या.

चेन स्नॅचिंगच्या प्रमाणातही वाढ
शहरातील गुलमाेहर काॅलनी, रामेश्वरनगरमध्ये पथदीप असून नसल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत अाहे. रात्रीच्या सुमारास सगळीकडे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या परिसरात चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे येथील नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीशी बाेलताना सांगितले. शहरातील अन्य काही भागांतही असेच चित्र असल्याचे दिसून अाले.

अपघातांसह हाेतेय गुन्हेगारीही वाढ
शहरातील पथदीपांशेजारील झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे पथदीप झाकाेळले जात असल्याने पुरेसा प्रकाश रस्त्यावर येत नाही. त्यामुळे छाेटे-माेठे अपघात हाेत असल्याच्या घटनादेखील समाेर येत अाहेत. याशिवाय रस्त्यांवर अंधार असल्याने गुन्हेगारांना माेकळे रान मिळत असून, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अाणि वाटसरूंना लुटण्याच्या घटनादेखील घडू लागल्या अाहेत.

झाडांच्या फांद्यांमध्ये हरवले पथदीप...
^उपनगरते इच्छामणी राेडदरम्यान जुने पथदीप काढून नवीन पथदीप बसविण्यात अालेले अाहेत. हे पथदीप १५ वर्षे जुन्या असलेल्या झाडांच्या फांद्याच्या विळख्यात अडकले असून, त्यांचा प्रकाशच पडत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदीपांचा काेणताही फायदा नागरिकांना हाेत नाही. झाडे नाही पण निदान फांद्या तरी छाटून पथदीप माेकळे करणे गरजेचे अाहे. जेणेकरून रात्रीच्या सुमारास पथदीपांचा प्रकाश रस्त्यावर पडू शकेल. - सतीश कुमावत, नागरिक,उपनगर
थेट प्रश्न
शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपरस्त्यांवरही समस्या; विद्युत डीपी, तारांवरील झाडांच्या फांद्याही ठरताहेत धाेकादायक
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या, तसेच धाेकादायक ठरणाऱ्या वृक्षांना हटवून त्यांचे पुनर्राेपण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी प्रमुख रस्ते, उपरस्त्यांच्या दाेन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे रस्त्याशिवाय पथदीपांच्या प्रकाशालाही अडथळा निर्माण हाेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अपुऱ्या प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाणही वाढले अाहे. एवढेच नाही तर विजेच्या तारांवरदेखील झाडांच्या फांद्या पसरल्याने शाॅर्टसर्किट हाेऊन वित्तहानीसह जीवितहानी हाेण्याचा धाेका निर्माण झाला अाहे. असे असतानादेखील महापालिकेकडून मात्र या फांद्या हटविण्याबाबत दुर्लक्षच केले जात अाहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
{ झाडांच्या फांद्यामुळे हरवले िदवे, उच्च न्यायालयाच्या अादेशाचे कारण देत महापालिकेकडून फांद्या छाटण्याच्या कामांकडे केले जातेय दुर्लक्ष
{ अंधारामुळे शहरात अपघातांसह गुन्हेगारीतही माेठ्या प्रमाणावर वाढ
{ शहरातीलअनेक परिसरात पथदीप झाडांच्या फांद्यांनी झाकले गेले अाहेत, त्यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असून अपघात चाेरीच्या घटनांमध्ये वाढ हाेत अाहे. त्याचे काय?
-याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी येत अाहेत. लवकरच त्याची दखल घेऊ.
{ मगपथदीपांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या ताेडत का नाही?
-उच्च न्यायालयाच्या अादेशामुळे अाम्हाला या फांद्या ताेडता येत नाहीत.
{ न्यायालयाच्याअादेशात ‘फांद्या ताेडू नका’ असा उल्लेख नसल्याचे म्हटले जाते. मग तरी कारवाई का हाेत नाही?
-या संदर्भात तज्ज्ञ समितीचा सल्ला घेण्यात येत असून, लवकरच पथदीपांवर अालेल्या झाडांच्या फांद्या काढण्याबाबत याेग्य ताे निर्णय घेतला जाईल.