आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शिक्षकदिनी जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती स्थापन केल्यानंतर बहुधा प्रथमच महापालिकेच्या १२ गुणवंत शिक्षकांबराेबरच खासगी शाळांतील शिक्षक शिक्षण अभ्यासकांचा सन्मान केला जाणार असून, संबंधित उत्कृष्ट शिक्षकांची यादी शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण यांनी सप्टेंबर या शिक्षकदिनाच्या दिवशी जाहीर केली.

महापालिकेचे शिक्षण मंडळ अनेक वर्षे न्यायप्रविष्ट वादात हाेते. त्यानंतर शिक्षण समितीची स्थापना झाली. त्यासही न्यायालयात अाव्हान दिल्यानंतर प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढाई चालली. या समितीचे पहिले सभापतिपद घेण्यासाठी इच्छुक असलेल्या चव्हाण यांनी कायदेशीर लढाई देत शासनाला निरुत्तर केले. त्यानंतर त्यांचे एकूणच प्रयत्न न्यायालयीन दाव्यात झालेला खर्च लक्षात घेत पहिले सभापतिपदही चव्हाण यांनाच मिळाले. दरम्यान, समितीची स्थापना स्थापना झाल्यानंतर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबराेबरच शिक्षकांचाही सन्मान करण्याचा प्रस्ताव पुढे अाला. त्यादृष्टीने यंदा प्रथमच महापालिका शाळेबराेबरच खासगी शाळांतील शिक्षकांनाही गाैरविले जाणार अाहे. विशेष म्हणजे, यंदा शिक्षक पुरस्कारासाठी जे प्रस्ताव प्राप्त झाले त्यातून शिक्षकांची निवड झालीच. मात्र, जे शिक्षक चांगले काम करूनही प्रस्ताव सादर करीत नाही त्यांचाही शाेध घेऊन सन्मानित केले जाणार अाहे. पुरस्कारासाठी निवड करताना शिक्षकांची शैक्षणिक सेवा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुद्धिमता विकास, सुलभ अध्यापनासाठी केलेले विशेष प्रयत्न, समाजात शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, निरक्षरांना साक्षरता, विविध शैक्षणिक संमेलनातील सहभाग, प्रशिक्षण अादींचा विचार करून शिक्षक पुरस्काराची निवड करण्यात अाली अाहे.

या शिक्षकांचा हाेणार सन्मान
मंगलारवींद्र शिंदे, मुख्याध्यापिका,अाडगाव शाळा क्रमांक ७०
बाळासाहेबशिवराम कडलग, पदवीधरशिक्षक, देवळालीगाव विद्यानिकेतन क्रमांक १३
मंगलावामनराव शेलार, पदवीधरशिक्षिका, स्वारबाबानगर शा. क्र. ९४
चांगदेवनाना साेमासे, उपशिक्षक,शिवाजीनगर शाळा क्रमांक २६
पुंडलिकसाेनू साेनवणे, मुख्याध्यापक,रायगड चाैक, शा.क्र. २०
गुलामहुसेन अन्सारी, मुख्याध्यापक,देवळाली गाव, शा.क्र. १३२
संगीतारवींद्र मदने, उपशिक्षिका,अानंदवली शाळा क्रमांक ३३
वैशालीप्रभाकर लचके, पदवीधरशिक्षक, मखमलाबाद नाका शाळा क्रमांक
सुशीलापाेपटराव पवार, उपशिक्षिका,अाडगाव शाळा क्रमांक ७०
भारतीमुरलीधर नांदूरकर, मुख्याध्यापिका,नांदूरगाव, शा.क्र. ३४
संताेषप्रकाश गंगावणे, पदवीधरशिक्षक, शाळा क्रमांक विद्यानिकेतन
खासगीशाळा : बापूराव साेमनाथ पवार, शिक्षक,सरस्वती विद्यालय, मीनाश्रीनिवृत्ती गायधनी, मुख्याध्यापिका,अभिनव बालविकास मंदिर, माेहनबाजीराव माळी, उपशिक्षिका,सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर, अाशारावण क्षीरसागर, उपशिक्षिका,श्रीराम मित्रमंडळ संच, प्राथमिक विद्यामंदिर, अाडगाव
शिक्षक अभ्यासक : सचिन उषा विलास जाेशी
शिक्षक हाच खरा गुरू
शिक्षकाच्या रूपाने झालेल्या परिस स्पर्शामुळेच अाज अनेकांनी यशाचा मार्ग गाठला अाहे. शिक्षक हाच खरा गुरू असून, त्यांचा खरा सन्मान करण्याचा प्रयत्न अाहे. -संजय चव्हाण, शिक्षण सभापती, शिक्षण समिती, महापालिका
बातम्या आणखी आहेत...