आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे रखडवणाऱ्यांचे पितळ पडणार उघडे, अधिकाऱ्यांच्या कामांवर अाता पालिका अायुक्तांची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वसामान्यांच्या मूलभूत कामांपासून तर माेठ्या विकासकामांपर्यंत, लाेकशाही दिनाच्या तक्रारीपासून तर तक्रार निवारण अॅपवर येणाऱ्या कैफियतीपर्यंत प्रत्येकाचे ट्रॅकिंग करण्यासाठी महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी एमपीअार प्रणाली कार्यान्वित केली अाहे. याद्वारे दर महिन्याला विभागीय अधिकाऱ्यापासून तर खातेप्रमुखापर्यंत प्रत्येकाला मासिक कामकाजाचा अहवाल द्यावा लागणार असून, मुदतीत कामे करणाऱ्यांचे पितळही उघडे पडणार अाहे.

पालिकेत अपुऱ्या मनुष्यबळाच्या नावाखाली मूलभूत कामे रखडवण्याचे प्रकार हाेत अाहेत. वाॅटर, गटार मीटर या मूलभूत समस्यांचीच साेडवणूक हाेत नसल्यामुळे कराचा भरणा कशासाठी करायचा? असाही सवाल नगरसेवक नागरिक करीत अाहेत. पालिकेच्या कामकाजात गतिमानता अाणणे गरजेचे झाले असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामांसाठी नगरसेवक अाक्रमक हाेणार असल्याचेही स्पष्ट झाले अाहे. त्यामुळे अायुक्तांनी ताक फुंकून पिताना अधिकाऱ्यांना एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून मासिक प्रगती अहवाल अर्थातच एमपीअार याेजना सुरू करण्यात अाली अाहे. याद्वारे काेणते अधिकारी मुदतीत काम पूर्ण करीत नाही हेही शाेधले जाणार अाहे. पालिकेत प्रत्येक कामासाठी एक मुदत असून, त्या मुदतीत काम हाेणार नसेल तर प्रशासनाविषयी लाेकांना अात्मीयता राहणार नाही. काही कामांना विलंब हाेऊ शकताे, मात्र तशी कारणे अाता अधिकाऱ्यांना द्यावी लागणार अाहे.

महापालिकेची वसुलीही वाढणार : एलबीटी,जाहीरात कर, बांधकाम विकास शुल्क अादी विविध माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अाढावाही घेतला जाणार अाहे. जेणेकरून महापालीकेची वसुली वाढवण्यासाठी प्रयत्न हाेणार अाहे.

कामांन मिळणार गती
फाळके स्मारक, तारांगण, कालीदास कलामंदिर, मुकणे याेजना अशी माेठी कामे पालीकेत सुरू अाहेत. ही कामे वेळेत करण्यासाठी एमपीअार परिणामकारक ठरणार अाहे. तसेच लाेकशाही दिन, तक्रार निवारण अॅप, लाेकायुक्तांकडे जाणाऱ्या प्रकरणांबराेबरच त्यांच्याशी पत्रव्यवहार करून समस्येचा निपटारा करण्याबाबत पाठपुरावा हाेणार अाहे.

काय अाहे एमपीअार
एमपीअारही वरकरणी साधी याेजना असून त्यात अधिकाऱ्याने खात्याशी संबधित महत्त्वाची कामे काेणती हे निश्चित केले पाहिजे. ते काम कधी पूर्ण करणे अपेक्षित अाहे. काम पुर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने प्रक्रिया करायची अाहे याचे टप्पे अाखावे लागतील. विहीत मुदतीत टप्पे गाठण्यासाठी अधिकाऱ्यांना धडपड करावी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...