आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची पालिकेत मालिका सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही वर्षांपासून सुरू असलेली स्वेच्छानिवृत्तीची मालिका महापालिकेत अजूनही सुरू असून, अाता उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांनी अायुक्तांकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केल्याचे वृत्त अाहे. वादग्रस्त उद्यान विभागाचा कार्यभार तिवारी यांच्यावर देण्यात अाल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्याचे बाेलले जात अाहे.

पालिकेत नाेकरी मिळावी म्हणून अनेक जण जिवाचे रान करीत असतात. नाेकरी मिळाल्यानंतर पदाेन्नतीसाठी धडपड सुरू हाेते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उच्च पदावरील अधिकारी वर्गाचा कल स्वेच्छानिवृत्तीकडे वळाल्याचे निदर्शनास येत अाहे. नाेकरीच्या अन्यत्र संधी मिळाल्यास वा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्वसाधारणपणे स्वेच्छानिवृत्ती घेतली जाते. पालिका मात्र याला अपवाद ठरत अाहे. विविध कथित गैरव्यवहारांच्या चाैकशा, अंतर्गत राजकारण, काही समाजविघातक व्यक्तींच्या दमदाट्या यामुळे अधिकारीवर्ग स्वेच्छानिवृत्तीकडे वळताना दिसत अाहे. यापूर्वी तत्कालीन शहर अभियंता श्रीरंग देशपांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने अाश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते. पालिकेतील इतक्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेण्याची ही पहिलीच घटना हाेती. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी पालिकेचे तत्कालीन शहर अभियंता अरुण उमाळे यांनी प्रशासनातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेतली हाेती. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीवरून दीर्घकाळ चर्वितचर्वण झाले हाेते. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर करण्याची मालिकाच सुरू झाली. त्याचदरम्यानच्या काळात शहर अभियंता तथा विधी विभागाचे तत्कालीन प्रमुख माेहन रानडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. रानडे यांनी मात्र निवृत्तीचे कारण गुलदस्त्यात ठेवले. राजकीय दबावाला कंटाळून तत्कालीन उद्यान निरीक्षक प्रमाेद फाल्गुने यांनीदेखील स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला हाेता. महासभेने ताे अमान्य केला. त्यानंतर खत प्रकल्पातील गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात अालेले तत्कालीन अधीक्षक अभियंता अार. के. पवार यांनीही मध्यंतरीच्या काळात प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला हाेता. परंतु, पाणीपुरवठा विभागात पवार यांच्याइतका अन्य अनुभवी अधिकारी नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात अाला. असे असले तरी खत प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गंभीर स्वरूपाच्या त्रुटी चौकशीत निदर्शनास आल्याचा ठपका ठेवत पवार यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात अाली अाहे. उद्यान विभागाचे वादग्रस्त निरीक्षक गाे. बा. पाटील यांनीही अापल्यावर वारंवार हाेणाऱ्या अाराेपांना कंटाळून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला हाेता. परंतु ताे फेटाळण्यात अाला. उद्यान विभागातील गैरव्यहारप्रकरणी त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात अाला अाहे. त्यांच्या जागेवर काम करण्याची जबाबदारी काही महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांच्यावर साेपविण्यात अाली अाहे. परंतु, त्यांनीही ३० सप्टेंबरपासून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला अाहे. यापूर्वीचे कथित गैरव्यवहार, उद्यान खासगीकरणाच्या निविदांना अल्प प्रतिसाद, निविदेच्या जाचक अटी अाणि त्यामुळे ठेकेदारांनी या कामांकडे फिरविलेली पाठ यामुळे उद्यान विभाग वादग्रस्त ठरत अाहेत. तिवारी यांच्याकडे यापूर्वी मिळकत, नगररचना तसेच सिंहस्थ विभागाचीही जबाबदारी हाेती.

कामाचा ताण की चाैकशांची भीती
महापालिकेतसध्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी सात ते अाठ विभागांच्या जबाबदाऱ्या अाहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा कामाचा ताण वाढलेला अाहे. दुसरीकडे विविध प्रकरणांत अधिकारी वर्गाचा हात असल्याचेही वेळाेवेळी पुढे अाले अाहे. या प्रकरणांत चाैकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून कदाचित स्वेच्छानिवृत्तीकडे अधिकाऱ्यांचा कल असल्याची शंका व्यक्त हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...