आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipality Water Will Stop If Not Paid 54 Crores

५४ काेटी आठ दिवसांत न दिल्यास हाेणार महापालिकेचे पाणी बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाला पुनर्स्थापनेच्या खर्चापोटी ५४ कोटी रुपये आठ दिवसांत दिल्यास त्यांचा पाणीपुरवठाच बंद केला जाईल, असे पत्रच नाशिक पाटबंधारे विभागाने पाठविले अाहे. त्यामुळे हे पैसे वेळेत भरल्यास आता दुष्काळी स्थितीत महापालिकेची प्रचंड गैरसाेय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गंगापूर धरणातील एकूण पाणीसाठ्यात महापालिकेचे पिण्यासाठी पाणी आरक्षण आहे. हे पाणी महापालिकेस दिल्याने धरणाच्या लाभक्षेत्रातील हजाराे हेक्टर ओलिताखालील जमीन ही पाणी मिळाल्याने बिगर सिंचनाखाली आली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्यांचे पुनर्स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने ५४ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार पत्राद्वारे त्याची अाठवण देऊनही मनपा या पैशांचा भरणा करत नाही. त्याबराेबरच महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शासनाने हा पुनर्स्थापनेचा खर्च माफ करावा, अशी मागणी सातत्याने लावून धरत महापालिकेने नेहमीच पैसे भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे २०११ पासून पाटबंधारे विभागाने महापालिकेकडून १.२५ पट दराने पाणीपट्टी आकारण्यास सुरुवात केली.

मनपानेही हेका कायम ठेवत लागलीच पाटबंधारे विभागाला दिली जाणारी पाणीपट्टी बंद केली. त्यामुळे २०११ ते मार्च २०१६ पर्यंत थकीत पाणीपट्टीची रक्कम १४.५० कोटींवर गेली आहे. आता मीटर बंदच्या कारवाईमुळे ०.२५ पट दंडाची रक्कम वाढल्याने त्यात २६ लाख रुपयांची भर पडली आहे.

परिणामी मनपावरील पाणीपट्टीचे संकट गडद झाले असून, पाटबंधारे विभागाने ही रक्कम अाठ दिवसांत भरल्यास पाणीपुरवठा आठ दिवसांत खंडित करण्याचा इशाराच पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागात पाणीपट्टीवरून वाद हाेण्याची शक्यता वाढली आहे.
पुढे वाचा.. वॉटर ऑडिट, अकाउंट नसतानाही पाणीकपात, दंडापोटी २६ लाख जादा भरावे लागणार