आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेला धरणातील पाणी मिळणारच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पालकमंत्र्यांनी धरणातील पाणी हे पिण्यासाठीच आरक्षित ठेवले असल्याचे सांगत गंगापूर धरणातील सर्वच पाणी महापालिकेला मिळण्याची शक्यता वाढलीच. पण, ३१ जुलैनंतर नवीन वर्ष सुरू होणार असल्याने नव्या वर्षात पालिकेला पिण्यासाठी पाणी द्यावे लागणार असल्याने पालिकेला ३१ जुलैनंतर पाणी मिळणारच आहे.

भीषण दुष्काळ आणि पाऊस लांबल्याने अखेर जादा दिवस पाणी पुरविण्यासाठी पालिकेवर पाणीकपातीची वेळ आली. पावसाचे आगमन झाले असले तरीही पाऊस समाधानकारक पडतो की नाही, याच धास्तीने धरणसाठ्यात पाणी वाढल्याशिवाय कपात रद्द करण्याचा धोका पालिका पत्करणार नाही. तर, शाश्वती नसल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करण्याचे नियोजन पालिकेकडून सुरू झाले. त्यामुळे वाचलेले पाणी हे पुढील कालावधीसाठी पालिकेला उपयुक्त ठरणार आहे. सध्या धरणात ९०० दशलक्ष घनफूट पाणी आहे. त्यातील केवळ ३०० दशलक्ष घनफूट पाणी हे पालिकेच्या हक्काचे आहे. उर्वरित ६०० दशलक्ष घनफूट पाणी हे एकलहरे विद्युत प्रकल्पासह इतर पाणी वापर संस्थांचे आहे. त्यातील एकलहरे प्रकल्पाने आपल्या हिश्श्याचे पाणी हे नदीतूनच उचलले असल्याने त्यांना धरणातून पाणी देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ३१ जुलैनंतर नव्या वर्षाच्या नियोजनानुसार पालिकेला पाणी हे मिळणारच असल्याने धरणातील पाणी प्राधान्याने प्रथम पालिकेला आरक्षित केले जाईल. त्यानंतरच इतर पाणी वापर संस्थांचा त्यात नंबर लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...