आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हसरूळचा पाणीप्रश्न जैसे थे, महापौरांनी दिलेल्या आदेशानंतरही पाणीपुरवठा विभाग ढिम्मच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- म्हसरूळपरिसरातील विस्कळित पाणीपुरवठ्याची समस्या प्रभाग सभापतींनी पाच दिवसांत दोनदा आंदोलन करून आणि महापौरांच्या आदेशानंतरही ‘जैसे थे’ आहे. महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला आदेश देऊनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
म्हसरूळ आणि परिसराला होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने संतप्त नागरिकांसह नगरसेवकांनी जलकुंभावर आंदोलन केले होते. महापौरांनी वेळा त्याची दखलदेखील घेतली. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या अजूनही जैसे थे आहे. मुबलक पावसामुळे धरणात पुरेसा जलसाठा झाल्याने पाणीकपात रद्द केली आहे. मात्र, असे असूनही म्हसरूळ परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पंचवटी प्रभागाच्या सभापती शालिनी पवार, नगरसेवक गणेश चव्हाण, रंजना भानसी, सिंधू खोडे यांनी पाच दिवसांत दोन वेळा आंदोलन केले. महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जलकुंभावर बोलावून घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
महापौरांच्या आदेशानंतर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी जलकुंभावर पाहाणी करून औपचारिकता पार पाडली. मात्र, परिसरातील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. यापूर्वीदेखील परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या उदभवली होती. त्या वेळीदेखील मोठा पाठपुरावा करावा लागला होता. सध्याच्या समस्येबाबत तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
विभागाचे अधिकारी करतात टाळाटाळ
महापौरांसमोर अधिका-यांनी तत्काळ काम करण्याचे आ श्वासन दिले. मात्र, त्यांची पाठ फिरताच अधिकारी गायब झाले. त्यामुळे येथील समस्या अजूनही ‘जैसे थे’ आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. गणेशचव्हाण, नगरसेवक