आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रानेच काढला काटा: नाशकात तरुणाची गोळ्या झाडून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मित्राशी चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून नाशकातील एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने डोक्यात व डोळ्यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आचारसंहितेत ही घटना घडल्याने पोलिस यंत्रणेची झोप उडाली आहे. प्रवीण उर्फ समीर सुरेश हांडे (24, रा. कोठारवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 2010 मध्ये समीरच्या मित्राचा काही जणांशी वाद झाला होता. हा वाद समीरने मिटवला होता. रविवारी रात्री दोघांनी समीरला शहरातील उदय कॉलनी येथे नेले. तिथे आधीच तीन जण उभे होते. या वेळी सर्वांची समीरशी बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी समीरच्या डोक्यात व डोळ्यात गोळी झाडली.