आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीय युवकाचा डाेक्यात बॅट मारून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पाथर्डी फाटा परिसरात परप्रांतीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली अाहे. अज्ञात युवकांनी डोक्यात बॅट मारून खून करीत पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या दामोदरनगर भागात आकाश कुवरप्रताप वर्मा (२८, टिंक्वल अपार्टमेंट, दामोदरनगर, पाथर्डीफाटा, मूळ राहणार बिहार) हा आपल्या मित्रांमवेत राहात होता. सर्व एकाच कंपनीत होते. आकाशाचा मित्र बुधवारी रात्री आला असता त्याला आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्याजवळच बॅट पडलेली होती. घाबरलेल्या मित्राने लोकांना बोलावित पोलिसांना कळविले. याप्रकरणी अविनाश तावडे याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खोलीत पाच जण रहात होते. यातील एकाशी आकाशचे भांडण होत असल्याचे समजले असून संबंधित युवक हा फरार झाला असला तरी अन्य मित्रांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...