आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये प्रथमच लागले कलम 303

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - जेलरोड परिसरात झालेल्या गूढ खुनाची उकल करीत उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. तिघे फरार आहेत. या गुन्ह्यात नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत प्रथमच भादंवि कलम 303 लावले जाणार आहे.

सर्व संशयित सराईत असून, चौघे आधीच खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. एकजण नाशिकरोड येथील खुनाच्या गुन्ह्यात सुटलेला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाचा कर्मचारी सुनील कोल्हे मित्रासोबत पार्टी करून रात्री कॅनॉलरोडने घरी जात असताना मोटारसायकलचा धक्का लागल्याने मायकल जॉन खरात (22, सुजाता बंगला, इंगळेनगर), संतोष विष्णू आंबेकर (24, रा. कोकाटे चाळ, पंचवटी), गिरीश सुरेश आव्हाड (21), सचिन ऊर्फ अनिल बॅटर्‍या सुरेश आव्हाड (25, रा. प्रतीक पूजा अपार्टमेंट, पंचवटी) व अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना मारहाण करून दगडाने खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब बुधवंत यांनी सांगितले. खरात यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून सुटला आहे. इतर चौघे 2011 मध्ये भद्रकालीच्या हद्दीत दारू पिण्याच्या वादातून केलेल्या खुनाची शिक्षा भोगत असून, हायकोर्टाच्या आदेशाने जामिनावर सुटलेले आहेत.