आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपनगरला युवकाची निर्घृण हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - उपनगरपरिसरात गुरुवारी (दि. २४) रात्री ११.३०च्या सुमारास पाच जणांच्या टाेळक्याने धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संतप्त नातेवाईक स्थानिक रहिवाशांनी उपनगरची महापालिका कर्मचारी वसाहत इमारत जमीनदाेस्त करून गुन्हेगारांवर माेक्काअंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता राेकाे अांदाेलन केले. महाराष्ट्र हायस्कूलच्या मागे झालेल्या या हल्ल्यात अाणखी दाेघे जखमी झाले अाहेत.

तणावपूर्ण परिस्थिती
हत्येच्याघटनेनंतर उपनगरला तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. काही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. उपनगरमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण अाहे.

महामार्ग झाला ठप्प
शेवटच्या पर्वणीमुळे नाशिक-पुणे महामार्गावर दाेन्ही बाजूंनी प्रचंड रहदारी हाेती. अचानक झालेल्या रास्ता राेकाे अांदाेलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प हाेऊन वाहनांच्या चार ते पाच किलाेमीटरपर्यंत रांगा लागल्या.