आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन भावांच्या मालमत्ता वादात लहान भावाने केला दाजीचा खून; आईला मारहाण केल्याचा राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दोन भावांच्या वादात मेहुण्याने मध्यस्थी करत मोठ्या शालकाची बाजू घेत सासूला मारहाण केली. या वादातून लहान शालकाने दाजीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २४) दुपारी वाजता पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवनच्या मागे उघडकीस आला. खून केल्यानंतर संशयित शालकाने स्वत:हून पोलिसांत हजर होत खुनाची माहिती दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथील तुळशीराम रो-हाऊस येथे राहणाऱ्या गोपाळ मगर आणि सुनील मगर या दोन भावांमध्ये मालमत्तेवरून वाद आहे. दोन दिवसांपूर्वी मोठा भाऊ गोपाळ याने त्याच्या आईला फ्लॅट सोडून निघून जाण्यास सांगितले. यातून दोघा भावांमध्ये वाद झाले. तसेच चार-पाच वर्षापूर्वी मोठ्या बहिणीला सोडून दुसरा घरोबा केलेला शशिकांत खुर्दळ (रा. खतवड) यानेही मोठ्या शालकाची बाजू घेत सासूला शिवीगाळ केली होती. 


शुक्रवारी दुपारी पुन्हा शशिकांत खुर्दळ हा मगर यांच्या घरी आला घर सोडून जाण्यासाठी त्याने सासूला मारहाण केली. याचा राग आल्याने लहान भाऊ सुनीलने त्यास आमच्या घरगुती वादात पडू नको, असे सांगितले. तरीही त्याने सासूला मारहाण केल्याने राग अनावर झाल्याने सुनीलने लाकडी दांडा त्याच्या डाेक्यात घातला. जाेरात फटका बसल्याने शशिकांत खाली कोसळला. रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलने स्वत:च पोलिस ठाण्यात हजर होत घडलेले प्रकार सांगितला. उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्यासह इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...