आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्केस्ट्रासाठी हजार रुपयांची वर्गणी न दिल्याने नाशकात एकाची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ऑर्केस्ट्रासाठी वर्गणी दिली नाही म्हणून नाशिकमध्ये एका नागरिकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. सलीम शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो नाशकातल्या रोकोडबावाडी या परिसरातील रहिवासी आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वालदेवी परिसरातील एका मंडळाने ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. त्यासाठी सलीम शेख याच्याकडे एक हजार रुपयांच्या वर्गणीची मागणी करण्यात आली होती.
मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे एवढी मोठी वर्गणीची देणे शक्य नसल्याने त्याने यास नकार दिला. यानंतर वर्गणी मागण्यास आलेल्या लोकांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शेखच्या घरावर दगडफेक केली. तलवार आणि लोखंडी रॉडने त्याला जबरी मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या सलीमला नाशिकमधील एका रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज (शनिवारी) मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी चौघांविरुध्द गुन्हा नोंदवला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.