आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder In Rokadoba Wadi, Grounds On Contribution

तरुणावर तलवार हल्ला; आप्तांनाही मारले, वर्गणीच्या कारणावरून रोकडोबा वाडीत खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऑर्केस्ट्रासाठी वर्गणी दिली नाही म्हणून सलीम इब्राहिम शेख (३५) या तरुणाचा लाेखंडी राॅडने मारहाण करून तलवारीने वार करून खून करण्यात आला. तसेच या तरुणाला साेडविण्यासाठी आलेली त्याची आई, भाऊ, वहिनी, पत्नी बहिणींनाही बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री राेकडाेबावाडी येथे घडली.

याबाबत उपनगर पाेलीस ठाण्यात अमजद इब्राहिम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, राेकडाेबावाडी येथील वालदेवी पुलाजवळ जयद्रथ प्रल्हाद काकडे यांनी ऑर्केस्ट्रा ठेवला होता. त्यासाठी आकाश ऊर्फ ईलू जयद्रथ काकडे, साेनू जयद्रथ काकडे, गजानन प्रल्हाद काकडे जयद्रथ काकडे (सर्व रा. रोकडोबा वाडी, नाशिकरोड) हे शुक्रवारी रात्री ८.३० वाजता शेख यांच्या घरी एक हजार रुपये वर्गणी मागण्यासाठी गेले. डॉ. आंबेडकर जयंतीला वर्गणी दिल्याने परत वर्गणी देण्यास शेख यांनी असमर्थता व्यक्त केल्याने ‘बघून घेतो’ असा दम देत सर्व जण निघून गेले. रात्री २.३० वाजेच्या सुमारास घरावर दगड फेकले जात असल्याने अमजद सलीम हे दोघे भाऊ बाहेर आले. त्यांनी समोर उभ्या असलेल्या काकडे यांना दगड का फेकता, अशी विचारणा करताच आकाश काकडे, सोनू काकडे, गजानन काकडे जयद्रथ काकडे यांनी तलवार लोखंडी रॉडच्या साह्याने सलीम यास मारहाण केली. सलीमला सोडविण्यास गेलेल्या अमजदची पत्नी रुक्सार, आई अख्तरबी, बहीण सुरय्या रुक्साना, शाहिन शेख, परवीन सलीमची पत्नी शबनम यांना लाेखंडी राॅडने मारहाण करण्यात आली.
जखमी शेख कुटुंबीयांनी उपनगर पोलिस ठाणे गाठले असता त्यांना उपचारार्थ बिटकाे रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान सलीमचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत सलीमचा भाऊ अमजद इब्राहिम शेख (१८) याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आकाश काकडे, सोनू काकडे जयद्रथ काकडे यांना ताब्यात घेतले, तर गजानन काकडेचा पोलिस शोध घेत आहेत. घटना समजताच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी घटनास्थळी भेट दिली.