आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॉलेजरोड परिसरातील महिलेच्या खूनप्रकरणी दहा दिवसांनी का होईना, शहर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

विसे मळ्यातील दिव्यदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या सुरेखा राजेंद्र खैरनार यांचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना 10 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांना धागेदोरे सापडत नसताना वणी पोलिसांनी ओझरखेड परिसरात हाणामारी करणार्‍या अनामिक दिनकर वाळके, स्वप्नील निवृत्ती रणमाळे (रा. पेठरोड, पंचवटी) यांना ताब्यात घेतले होते. यात अनामिक याच्याकडे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली होती. या संशयावरून सरकारवाडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तपासासाठी त्यांना ताब्यात घेतले. या दोघांना नाशिकच्या न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.