आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहरा जळालेल्या मृतदेहाने खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सिन्नरफाटायेथील जुन्या पुलाखाली चेहरा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. हा घात की अपघात आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सिन्‍नरफाटा परिसरात अलीकडच्या काळातील हा तिसरा खून असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिन्‍नरफाटा पुलाखाली पॅनल कॅबीन कंपाऊंडजवळ ५० ते ५५ वयोगटातील महिलेच्या मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्यावर मारहाण करून चेहरा अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील अनोळखी महिलेचा हा मृतदेह मिळून आला. पोलिसांचा महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळून आले नाहीत. मृतदेह शवविच्छेदनानंतर महिलेचा घात आहे की अपघात, याबाबत माहिती मिळाल्यानंतर निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, असे वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहाळदे यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीत महिलेचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चोरीकरताना सिडकोत तिघा संशयितांना अटक
पाथर्डीफाटा परिसरात महामार्गाच्या सर्व्हिसरोडवर भंगार दुकानात चोरी करणाऱ्यांना पकडण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून एका कारसह तीन लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार त्यांचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना हाॅटेल अंगनशेजारील भंगार दुकानाचे शटर उघडे दिसले. बाहेर दोन व्यक्ती एक चारचाकी कार (एम.एच. १५ डी.सी. ९७८६) दिसले. चौकशी केली असता दुकानात एकजण पोत्यात सामान भरत होता. भगवान रामदास गाढवे (३५), उत्तम नामदेव भालेराव (२९, दोघे रा. देवळालीगाव) जावेद रज्जाक शेख (२१) द्वारका यांना ताब्यात घेतले. ते सराईत गुन्हेगार आहेत.