आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण गवळीशी संबंधित गुंड बाल्या मोरेची हत्या, आधी गोळ्या झाडल्या मग चॉपरने केले वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटीतील आरटीओ कॉर्नर भागातील कलानगरमधील बालाजी चौकात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अरुण गवळीशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष सराईत गुन्हेगार निखिल मनोहर मोरे उर्फ बाल्या याच्यावर ते जणांच्या टोळीने गोळ्या झाडून तसेच नंतर चॉपरने वार करत खून केला. त्यामुळे नाशिकमध्ये मध्यंतरी शांत झालेेले टोळीयुध्द पुन्हा भडकते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता अाहे. 

बाल्यासाेबत असलेले अमाेल निकम सूरज खाेडे हे ही या हल्यात जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. या प्रकरणी संशयित जॉन काजळे, अमर गांगुर्डे, कुरेशी आदींसह सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक देशमुख तातडीने हजर झाले. जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाल्यानंतर उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात अाणली. मोरेविरुध्द खून, दरोडा, प्राणघातक हल्ल्यासह ते गंभीर गुन्हे दाखल होते. काही वर्षांपूर्वी भाग्या नामक गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी बाल्या चर्चेत अाला हाेता. त्याच ठिकाणी बाल्याचा खून झाला. 

अटकेत असलेला सराईत गुन्हेगार व्यंक्या मोरेचा बाल्या भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मार्च महिन्यात बाल्याने अखिल भारतीय सेनेत प्रवेश केला हाेता. यावेळी माेठा साेहळा झाला हाेता. दाेन दिवसांपूर्वी बाल्याच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रमही पार पडला हाेता. गेल्या दोन महिण्यांपूर्वीच पंचवटीमध्ये टोळीयुध्दातून किरण निकम याची हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोहिम राबवून अट्टल गुन्हेगारांना अटक केली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा पंचवटीत खून झाला आहे. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण अाहे. 

जिल्हा रुग्णालयात तणाव 
गंभीरजखमी बाल्या मोरेला तातडीने रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...