आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकासराईत गुन्हेगाराचा मंगळवारी (दि. १४) राहत्या घरात धारदार हत्याराने खून झाल्याची घटना गंगापूररोडवर जोशीवाडा परिसरात घडली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रामानंद शिंदे (वय २५, जोशीवाडा) या युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात शेजाऱ्यांनी पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी पथकाने पाहणी केली असता सुऱ्याने पोटात वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचा पोलिसांनी अंदाज असून, मृत शिंदेवर सरकारवाडा, पंचवटीसह अन्य पोलिस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयितांनी खून केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, आठ दिवसांत शहरात खुनाची तिसरी घटना घडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभीच शहरात खुनाची घटना घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.