आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder On Pethroad In Nasik News In Divya Marathi

पेठरोडवर मजुराचा निर्घृण खून, पंचवटी परिसरात आठ दिवसांतली तिसरी घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - किरकाेळवादातून एका सराईत गुन्हेगाराने रस्त्यावर झाेपलेल्या मजुराचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री पेठरोडवर घडली. संशयिताला तत्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले. आठ दिवसांत पंचवटी परिसरातील खुनाची ही तिसरी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरमाळ (त्र्यंबकेश्वर) येथील ३०-४० अादिवासी कुटुंबे मजुरीसाठी नाशिकमध्ये आलेली असून, ती पेठरोडवर उघड्यावरच रात्री वास्तव्यास असतात. रविवारी (दि. १४) मध्यरात्री मृत सुनील निकुळे यांच्या पत्नीला काेणीतरी स्पर्श केल्याने जाग येऊन त्यांनी आरडाओरड केली. संशयित राहुल िशंदे याने तेथून लगेच पलायन केले. निकुळे यांनी पेठ फाट्यापर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन संशयित पळून गेला. मात्र, काही वेळाने संशयित पुन्हा तेथे अाला निकुळेवर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. काही नागरिकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

उपआयुक्त एन. अंबिका, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे आणि पथकाने रात्री फुलेनगर परिसरात शोध घेत सराईत गुन्हेगार राहुल शिंदेला अटक केली. शिंदेवर यापूर्वी प्राणघातक हल्ला, चोरी, दरोडा, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मालेगाव स्टँडवर तरुणाचा खून, जागा रिकामी करण्यासाठी महिलेची हत्या आणि महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न रोखणाऱ्या मजूर पतीचा खून या घटनांमुळे दहशत निर्माण झाली आहे. कोंबिंग आणि ऑलआऊट कारवाई होत नसल्याने गुन्हेगार मोकाट आहे.

मजुरांवर अत्याचार
दिवसभरमजुरी करून पेठरोडवर रस्त्यावर रात्र काढणाऱ्या मजुरांना लुटणे, महिला मजुरांची छेड काढणे, अतिप्रसंग करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, मजुरांना धमकावले जात असल्याने पोलिसांत तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे सराईत गुन्हेगारांचे अाणखी फावत आहे.

या वर्षी दोन महिन्यांमध्ये सात खून
नवीनवर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांत सात खुनांची नोंद करण्यात आली. यापैकी तीन खुनांची नोंद एकट्या पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ही संख्या वाढलेली आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.