आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गुंडाराज; भररस्त्यात खुनामुळे नागरिकांमध्ये चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील कायदा सुव्यवस्था धाेक्यात अाणणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, गंगापूरराेडवर महिला बॅंक परिसरात भरदिवसा, भररस्त्यात झालेल्या कर्मचारी महिलेच्या खुनाने त्याचाच प्रत्यय अाला अाहे. एेन सिंहस्थाच्या ताेंडावर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने भाविक साेडा, नाशिककरांमध्येच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली अाहे. गेल्या सात महिन्यांत २५ खून, तर २२ प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या अाहेत.

गुन्ह्यांचा हा वाढता अालेख पाहता शहरात कायद्याचे नव्हे, तर गुंडांचे राज्य असल्याचा अनुभव नाशिककर घेत अाहेत. बुधवारी असहाय महिलेवर हल्ला हाेत असताना दहशतीपाेटी कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे अाले नाही. या रस्त्यावर अनेक शाळा-महाविद्यालये असून तेथे विद्यार्थ्यांची लगबग सुरू असतानाच अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या महिलेची स्थिती पाहून विद्यार्थ्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला.

मारहाण, वाहनांची जाळपाेळ, महिलांचे साैभाग्याचे लेणे अाेरबाडणे, दराेडे, घरफाेड्या, टाेळ्यांमधील वादांतून खून, वाहनचाेरी यासारख्या वाढत्या घटनांमुळे पाेलिसांचा वचक कमी झाला अाहे. त्यामुळे बारा वर्षांनी येणाऱ्या महाउत्सवाच्या काही दिवस अाधी ‘गुन्हेगारांचे शहर’ म्हणून या तीर्थक्षेत्राची नवीन अाेळख निर्माण हाेत अाहे.

रात्रीच्या वेळी शहरात पाेलिसांची गस्त फक्त हाॅटेल टपऱ्या बंद करण्यापुरतीच हाेत अाहे. माेठ्या संख्येने पाेलिस रस्ताेरस्ती वाहनांची कागदपत्रे तपासण्यासाठी तैनात करण्यात अाल्याचे दृश्य दिसते. हाच फाैजफाटा गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी वापरला तर गुन्हेगारीचे प्रमाण काहीअंशी तरी कमी हाेईल, असे नागरिकांचे म्हणणे अाहे. शहराच्या विविध भागांमध्ये काेम्बिंग अाॅपरेशनसारख्या माेहिम राबविल्यास गुन्ह्यांचा उताराला लागेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.