आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या दुचाकींच्या हिश्श्यातून झालेल्या वादामधून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - लासलगाव-कोळपेवाडीरस्त्यावरील सातमोऱ्या परिसरात बुधवारी झालेल्या खुनाचा १८ तासांत उलगडा झाला आहे. चाेरीच्या दुचाकींचा हिस्सा कमी दिल्यावरून वाद हाेऊन रॅकेटमधील रोहन ऊर्फ पवन दिवे याची डाेक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी देण्यात अाली अाहे.

पोलिसांना घटनास्थळावरून सिमकार्ड बॅटरी मिळून आली. या सिमकार्डवरून एकाच व्यक्तीला सतत संपर्क केला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी देवपूर येथील तुषार ऊर्फ मंगेश रावसाहेब गडाख यास ताब्यात घेतले. चौकशीत हत्या झालेला रोहन ऊर्फ पवन उत्तम दिवे (देवपूर, सिन्नर) हा दुचाकी चाेरून कैलास दत्तात्रय जगताप, सागर चांगदेव जगताप (मरळगोई बुद्रुक, निफाड), गणेश दिगंबर जाधव (विंचूर), तुषार रावसाहेब गडाख (देवपूर, सिन्नर) यांना कमी पैशांत विक्री करायचा. मात्र, रोहन दिवे हा या चौघांना विकलेल्या दुचाकींचे कमी पैसे दिले म्हणून तगादा लावत होता. पैसे दिल्यास सर्व माहिती माझ्या पोलिस भावाला देईल, अशी धमकी देत होता.

यामुळे घाबरलेल्या त्या चौघांनी राेहनला विंचूरला बोलाविले. येथे चौघांनी त्याला हाॅटेलात नेऊन मद्य पाजले. मद्यात औषध टाकले हाेते. त्यामुळे त्याला चक्कर येऊ लागल्याने या चौघांनी त्याला चोरून आणलेल्या दोन दुचाकींवरून कोळपेवाडी रस्त्यावरील सातमोऱ्या भागात नेले. तेथे डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली पळून गेले.