आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवीट सुरांना लाभले कोंदण तालाचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्या जादुई बाेटांची भुरळ अवघ्या तालविश्वाला पडते अन् जे सूर कानात साठवत मन हिंदाेळ्यावर झुलू लागते, अशा तालसम्राट सूरमणीच्या अनाेख्या जुगलबंदीची अनुभूती शनविारी सायंकाळी रसिक नाशिककरांना अाली. जगप्रसिद्ध तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन बासरीवादक पंडित राकेश चाैरसिया यांच्या ‘वाह उस्ताद’ या अडीच तास रंगलेल्या मैफलीने संगीतातील परमाेच्च श्रवणसुखाचा अानंद दिला. पहाडी धूनमधील भैरवीने मैफलीची सांगता झाल्यावरही ते सूर ताल काना-मनात अन् गात्रांमध्ये रेंगाळत राहिले...
व्हायाेलिन म्युझिक अकॅडमी पार्कसाइड हाेम्स यांनी ‘दवि्य मराठी’च्या माध्यम प्रायाेजनासह या मैफलीचे आयोजन केले होते. पंडित हरिप्रसाद चाैरसियांचा वारसा सक्षमतेने पुढे नेण्यास पात्र असल्याचा प्रत्यय राकेश चाैरसिया यांनी बासरीवादनातून दिला. हिंदुस्तानी संगीतशैलीचा गाेडवा पं. हरिप्रसादजींच्या वादनातील नजाकत राकेशजींच्या बासरीतून झरत हाेती. प्रारंभी यमन रागातील अालाप, जाेड, झाला, मध्य लय, द्रूत गत सादर केली. बासरीतून निघणारा एक - एक सूर जणू शब्द बनून डाेलायला लावत हाेता. त्यानंतर राकेशजींनी राग किरवानीतील दाेन रचना तीन ताल सादर केला. अखेरच्या सत्रातील पहाडी धूनने रसिकांनी ठेका धरला.
डाेक्यातून घुंगराचा अावाज अन्...
उस्तादजींच्या मनात कायमच एक खाेडकर बालक असल्याचा प्रत्यय त्यांनी या मैफलीतही दिला. तबल्याची कमाल सादर करताना मध्येच उजवा हात डाेक्यावर मारत अाणि दिसणारा डावा हात घुंगराच्या डफलीवर मारत काढलेल्या घुंगराच्या अावाजाने प्रेक्षकांमध्ये हास्यस्फाेटच हाेत हाेता.