आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज होणार "स्वरझंकार', पंडित शिवकुमार शर्मा, पंडित उपेंद्र भट यांची मैफल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सूर,ताल आणि त्यावर तल्लीन होण्याची अनुभूती नाशिककर रसिकांना या वीकेंडला घेता येणार आहे. व्हायोलिन म्युझिक अकॅडमी पुणे आणि लिसनर्स ग्रुप ऑफ नाशिक यांच्या वतीने शहरात होत असलेली दिग्गजांची ‘स्वरझंकार’ ही मैफल आज सजणार आहे. शनिवार (दि. १५) आणि रविवार (दि. १६) असे दोन दिवस हे स्वरपुजारी स्वराभिषेक करतील.

व्हायोलिन म्युझिक अकॅडमीतर्फे स्वरझंकारचे हे नाशिकमधील पाचवे वर्ष आहेे. या वर्षी दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद तौफिक कुरेशी, देवकी पंडित, पंडित उपेंद्र भट, पंडित रामदास पळसुले आणि पंडित योगेश समसी यांच्या सुरावटींवर रसिकांना तल्लीन होता येणार आहे. शनिवारी भारतरत्न पंडित भीमसेन जाेशी यांचे पट्टशिष्य किराणा घराण्याचे पंडित उपेंद्र भट यांच्या स्वरवंदनेने मैफलीचा शुभारंभ होणार आहे. यानंतर जागतिक कीर्तीचे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. तर, रविवारी नाशिककरांच्या आवडत्या गायिका देवकी पंडित यांचे स्वर आणि तौफिक कुरेशी यांचे वादन रसिकांना एेकायला मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना देणार मोफत प्रवेशिका
तरुणांमध्ये अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रथम येणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना (१८ वर्षांखालील) मोफत प्रवेशिका देण्यात येणार आहेत. सदर प्रवेशिका कार्यक्रमस्थळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून देण्यात येतील.
पंडित तौफिक कुरेशी
प्रसिद्धपर्क्युनिस्ट म्हणून तौफिकजींचे नाव आहे. त्यांना या वाद्याचे अनिभिषिक्त सम्राट मानले जाते. ते उत्तम संगीतकारही आहेत.
देवकी पंडित
लोकप्रियगायिका असलेल्या देवकी पंडित ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोच्या उत्तम परीक्षिका म्हणून सगळ्यांनाच परिचित आहेत.