आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगनभेदी तालनाद: पं. तौफिक कुरेशी, पं. रामदास पळसुले यांच्या तालसाधनेने रसिक मंत्रमुग्‍ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देवदरबारी राज्याभिषेकाचा अंतिम क्षणसोहळा आनंदून जावा अन् त्यावेळी साऱ्या तालवाद्यांचा घुमार एकवटून त्याने ईशचरणी साधना अर्पण करावी.. त्याचा ध्वनी गगनाच्या चराचरांत एकवटून जावा अन् आसमंत सुखक्षणांच्या अनुभूतीने स्तिमित व्हावा, असे क्षण नाशिककर रसिकांच्या आेंजळीत आज वादक पंडित द्वयींनी बहाल केले, तेव्हा रसिक अभिमानाने नतमस्तक झाले. प्रिन्स ऑफ पर्क्युसन पंडित ताैफिक कुरेशी आणि पंिडत रामदास पळसुले यांच्या वादनाने रसिकांना तालसाधनेचे अविस्मरणीय क्षण दिले.
गगनभेदी तालनाद
आलापी,टिपेला पोहोचलेले स्वर आणि घेतलेल्या ताना रसिकांना मोहिनी घालत होत्या. त्यानंतर झालेल्या आफ्रिकन वाद्य जेम्बे आणि भारतीय वाद्य तबला यांच्या जुगलबंदीने रसिकांना ताल, घुमार, नाद, मात्रा, आवर्तन, सम एकमेकांपासून किती टिपेला जाऊ शकतात, आणि किती एकरूप होऊ शकतात, याची प्रचिती दिली. क्षणाक्षणाला टाळ्या, शिट्या, तर तरुण रसिकांनी एकच नादध्वनी करत या तालजुगलबंदीचा जल्‍लोषच साजरा केला. पंडित द्वयी एकमेकांना दाद, साद आणि प्रतिसाद देत असताना जणू त्यांची वाद्येच एकमेकांशी संवाद साधत असल्याचा भास होत होता. विशेष म्हणजे, सायंकाळी वरुणराजाने हजेरी लावली असतानाही दर्दी रसिक या मैफलीला आवर्जून उपस्थित होते. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मैफल उत्तरोत्तर सजवत गेला.