आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर तेच छेडीता...एसएमअारकेत रंगली सुगम संगीत स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गातापंढरीची वारी.., माळ पदक विठ्ठल.., भय इथले संपत नाही... यासह भारूड, अभंग भक्तिगीतांनी एसएमअारके महाविद्यालयाचा परिसर सुरावटींवर हाेता. निमित्त हाेते दादर माटुंगा कल्चरल सेंटर आणि एसएमआरके महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अायाेिजत आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे.
विष्णू रामचंद्र केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेचा प्रारंभ पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘जाता पंढरीची वारी’ या अभंगाने झाला. यानंतर ‘माळ पदक विठ्ठल’ या मिश्र पिलू रागातील स्पर्धकांनी सादर केले. त्याचप्रमाणे भय इथले संपत नाही, श्रावणात घननिळा बरसला, रंगुनी रंगात साऱ्या आणि चंद्र कंस रागातील गोकुळातल्या गौळणी साऱ्या ही रचना सादर झाली. ‘येडु रूसली रडत बसली’ यांसारख्या लोकगीतांचाही स्पर्धेत समावेश होता.
स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातून एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी शास्त्रीय संगीत, भारूड, गझल, लोकगीत, अभंग, भक्तिगीते अशा विविध प्रकारांची गाणी पात्र होती. ही स्पर्धा प्राथमिक स्तरावर एकूण १६ ठिकाणी घेण्यात येत आहे. स्पर्धेची अंतिम फेरी २१ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. नाशिक येथील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रसिका बहाद्दरपूरकर-जानोरकर, अमृता हडप यांनी काम बघितले. तर, कार्यक्रमाला अशोक केळकर, प्रा. अविराज तायडे आदी उपस्थित होते