आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षण प्रश्नावरून पुन्हा मुस्लिम ब्रिगेडचे रेल रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठा मुस्लिम समाजास शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोडला मंगळवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले.
मुस्लिम समाजास शिक्षण नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा कायदाकरण्यात यावा, जाती-धर्माच्या आधारावर उच्च शिक्षण नोकऱ्या नाकारणाऱ्या शैक्षणिक संस्था, खासगी संस्था अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मराठा आरक्षणास सरळ ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावे, या त्यांच्या मागण्या होत्या. या मागण्या मान्य झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा अजीज पठाण, मुस्ताक शेख, योगेश निसाळ, माधुरी भदाणे, वसीम पिरजादे आदींनी आंदोलनादरम्यान दिला.
आघाडी शासनाच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के मुस्लिम समाजाला टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु, युती शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे मराठा समाजाला न्यायालयाच्या माध्यमातून अडकवून ठेवण्यात आले. तसेच, मुस्लिम समाजाला सच्चर अहवाल, न्या. रंगनाथ मिश्रा मेहमूद रहेमान समितीच्या शिफारशींच्या माध्यामातून टक्के आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयानेदेखील मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत आदेश केलेले असतानासुद्धा फडणवीस सरकारने मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करून जातीयवादी धोरण समोर आणले आहे. त्याचा संघटनेच्या वतीने आंदोलनावेळी निषेध करण्यात आला.
आंदोलनांची पुनरावृत्ती
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्याच महिन्यात संभाजी ब्रिगेडने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन केले होते. या आंदोलनाची मंगळवारी पुनरावृत्ती झाली.
बातम्या आणखी आहेत...