आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अारक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मालेगावात भव्य माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - मुस्लिम समाजाला शिक्षण व नाेकरीत अारक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह सवलतीच्या इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ७) मालेगाव येथे राज्यातील पहिला अारक्षण माेर्चा काढण्यात अाला. अामदार अासिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशनने काढलेल्या माेर्चास विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचे सातवे वंशज मन्सूर अली यांची माेर्चात प्रमुख उपस्थिती हाेती. प्रांताधिकारी अजय माेरे यांनी माेर्चास्थळी येऊन निवेदन स्वीकारले.

‘मुस्लिमांना अारक्षण मिळालेच पाहिजे, एकच मिशन - मुस्लिम अारक्षण’ अादी घाेषणा देत माेर्चा निघाला. नंतर माेर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी अामदार शेख यांनी राज्य सरकारवर जातीयवादाचा अाराेप केला. तत्कालीन सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला दिलेले अारक्षण भाजप सरकारने रद्द केले. न्यायालयाने मुस्लिम समाजाला किमान शिक्षणात पाच टक्के अारक्षण द्यावे, अशी सूचना केली हाेती. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष केले. मराठा समाज अारक्षणाला अामचा पूर्ण पाठिंबा अाहे. मुस्लिम समाजाला हक्काचे अारक्षण नाकारले, तर सरकारला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही शेख यांनी दिला. राज्य सरकारने १७ नाेव्हेंबरपर्यंत मुस्लिम अारक्षण जाहीर करावे, अन्यथा १८ नाेव्हेंबरला लाखाे मुस्लिमांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी माेर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले.

अारक्षणाची मागणी मान्य हाेत नाही ताेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. टिपू सुलतानचे वंशज मन्सूर अली म्हणाले, देशासाठी बलिदान देणाऱ्या मुस्लिम समाजाला अाज स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची वेळ अाली अाहे. ही बाब सरकारसाठी लाजिरवाणी अाहे. डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा पूर्ण सन्मान करून अारक्षण द्यावे, अन्यथा परिणामांना सामाेरे जावे लागेल.

देशात मुस्लिमांवर अन्याय
देशभरात मुस्लिम समाजावर अन्याय, अत्याचार केले जात अाहेत. इतर समाजाला भडकावून राजकीय स्वार्थ साधला जात अाहे. टिपू सुलतान यांच्या सैन्यात ८० टक्के सैनिक इतर समाजांचे हाेते. देशाच्या भावी पिढीने शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी हाेऊन देशाच्या प्रगतीचे साक्षीदार व्हावे, असे अावाहन त्यांनी केले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने माेर्चा मार्गावर व सभास्थळी ड्राेन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात अाली हाेती.

हम सच्चे भारतीय मुसलमान
व्यासपीठावर दहा वर्षांखालील पाच मुले व पाच शाळकरी मुली यांना स्थान देण्यात अाले हाेते. मुस्लिम समाजाला शिक्षणात अारक्षणाची गरज याविषयी कुलसुम हलीम सिद्दिकी या विद्यार्थिनीने अापले विचार मांडले. ‘हम सच्चे भारतीय मुसलमान हैं, हमे नफरताें से नही हक से रिझर्वेशन चाहिए’ अशी घाेषणा भाषणातून करत तिने मुस्लिम समाजाच्या याेगदानाचा इतिहास सांगितला.
बातम्या आणखी आहेत...