आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ताेंडी तलाक’ पीडित महिला कथन करणार अापबीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डचे कायदे अाम्हाला मान्य असून ताेंडी तलाक पद्धतीमुळे महिलांवर कुठलाही अन्याय हाेत नसल्याची भूमिका मुस्लिम महिलांकडून मांडली जात अाहे. मात्र, ताेंडी तलाकने अायुष्य उध्वस्त झालेल्या महिला ‘मेरी कहानी - अपनी जुबानी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांवरील अन्याय समाजासमाेर अाणणार अाहे.

पुणे शहरात शनिवारी (दि.२६) मुस्लिम सत्यशाेधक मंडळातर्फे मुस्लिम महिला अधिकार परिषदेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या परिषदेत पीडित महिला अापली अापबीती कथन करून मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्डच्या नियमांना विराेध दर्शविणार अाहेत. देशभरात ताेंडी तलाक पद्धतीस समर्थन व समान नागरी कायद्यास विराेध दर्शविण्यासाठी विविध मुस्लिम संघटना निदर्शने करत अाहेत. शरियतमधील हस्तक्षेप बंद करा ही मागणी अांदाेलने, धरणे, स्वाक्षरी माेहिमांद्वारे अधिक तीव्र करण्याचे प्रयत्न हाेत अाहेत. मुस्लिम बहूल शहरांमध्ये याविषयी सर्वाधिक अांदाेलने सुरू अाहेत. सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांकडून प्रशासनाला निवेदने सादर करून प्रखर विराेध केला जात अाहे.

सर्वसामान्य कुटूंबातील मुस्लिम महिला यासंदर्भात काही बाेलत नसल्या तरी राजकीय हेतूने प्रेरीत हाेऊन महिलांना ताेंडी तलाकच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरविले जात अाहे. मालेगाव शहरात मुस्लिम महिलांनी धरणे अांदाेलन करून शरीयतला पाठींबा दिला अाहे. ताेंडी तलाक पध्दत महिलांवर अन्याय, अत्याचार करणारी अाहे हे उघडपणे बाेलण्यास कुणी तयार नसल्याने याकामी मुस्लिम सत्यशाेधक मंडळाने पुढाकार घेतला अाहे.

परिषदेस नूर जहीर, अर्शद अली, साेफिया खान, रुबिना पटेल, मुमताज शेख, डाॅ. तसनीम पटेल, रेहाना बेलीम, रुबिना मिर्झा यांच्यासह दिल्ली, गाझीयाबाद, अहमदाबाद, नागपूर, मुंबई, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, कर्नाटक, उत्तरप्रदेश अादी राज्यातून महिला उपस्थित रहाणार अाहेत. महिलांनी अापल्यावरील अन्याय व अत्याचाराला विराेध करण्यासाठी अाणि अशा गैरप्रकारांना राेखण्यासाठी या महत्वाच्या परिषदेस माेठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अावाहन मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे राज्याध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबाेळी यांनी केले अाहे.

देशभरातील महिला शनिवारी येणार एकत्र
देशभरातील महिलांना एकत्र करून पुण्यात शनिवारी राष्ट्र सेवा दल सभागृहात मुस्लिम महिला अधिकार परिषद अायाेजित केली अाहे. या परिषदेेचे उद््घाटन उत्तर प्रदेश येथील काशीपूरच्या सायराबानाे यांच्या हस्ते हाेईल. मुस्लिम पर्सनल लाॅचे महिलाविराेधी कायदे जगासमाेर अाणून महिलांमध्ये जनजागृती करण्याहेतू ‘तलाक एक सवाल’ या विषयावर हिना काैसर खान व अार्शिया खान यांचे व्याख्यान हाेणार अाहे. लाॅ बाेर्ड निर्णयाच्या शिकार झालेल्या महिला ‘मेरी कहानी - अपनी जुबानी’ या कार्यक्रमातून अापबीती मांडणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...