आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुले विकणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे अादेश, राज यांचा घरकुल वितरण साेहळ्यात हल्लाबाेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबईत सरकारी घरे विकून पुन्हा झाेपडीत जाण्याचा धंदाच सुरू अाहे. त्यामुळे ‘तुम्हाला मिळालेले घर विकून पुन्हा झाेपडीत जाऊ नका’ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घरकुल याेजनेवर लक्ष ठेवण्याचेही अादेश महापाैर स्थानिक नगरसेवकांना दिले.
मनसे नगरसेवक यशवंत निकुळे, दीपाली कुलकर्णी यांच्या प्रभागातील शिवाजीवाडी घरकुल याेजनेतील ३२० लाभार्थ्यांना चावी देण्याचा साेहळा ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना चावीही देण्यात अाली. या कार्यक्रमात ठाकरे यांचे भाषण नव्हते, मात्र अचानक त्यांनी माइक घेत उपस्थितांना संबोधले.

ते म्हणाले की, झाेपड्या उभारून घरकुल मिळवायचे मिळालेली घरकुले विकून पुन्हा झाेपड्या उभारायचा असा मुंबईत धंदाच सुरू आहे. त्यामुळे नशिबाने मिळालेली घरे विकून पुन्हा झाेपडीत जाण्याची विनंती केली. हक्काचे घर मिळणे माेठी बाब असून, पुन्हा झाेपडीत जाण्यापेक्षा येथेच राहून स्वत:चे कुटुंबीयांचे जीवनमान उंचवा, अशाही सूचनाही त्यांनी केली. याच ठिकाणी गाडी अंगावरून गेल्याने बचावलेल्या दीड वर्षाच्या झाेया या चिमुरडीसही ठाकरे यांच्या हस्ते ११ हजारांची मुदत ठेवीसाठी रक्कम देण्यात अाली. दरम्यान, मनसे गटनेते अनिल मटाले सभापती कांचन पाटील यांच्या प्रभागातील शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन साेहळाही पार पडला. येथेच यूपीएससीतील गुणवंतांचा ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्कार साेहळा झाला. त्यानंतर सभागृहनेता सलीम शेख सभापती उषा शेळके यांच्या प्रभागातील रस्ता तसेच अतिथी या स्वस्तात गरिबांसाठी पुरी-भाजी पुरवण्याच्या केंद्रांचे उद््घाटनही झाले.

दौऱ्यातील गर्दीमुळे सुखावले राज
लाेकसभा,विधानसभा िनवडणुकीतील पराभव, मनसेतील जुन्या जाणत्यांच्या पक्षांतरामुळे पडलेले खिंडार यामुळे मध्यंतरी राज यांच्याजवळील गर्दीचे वलय कमी झाल्याचे दिसत हाेते. त्यांच्या दाैऱ्याला नगरसेवक कार्यकर्त्यांची फारशी उपस्थिती िदसत नव्हती. मात्र, शनिवारच्या दाैऱ्यात चांगलीच गर्दी झाल्याचे िदसले. शेख मटाले यांच्या प्रभागातील कार्यक्रमांसाठी माेठ्या संख्येने लाेक उपस्थित हाेते. खासकरून निकुळे कुलकर्णी यांच्या प्रभागातील कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाल्याने ठाकरे चांगलेच सुखावले.त्यामुळेच की काय, पुढे महापाैरांच्या प्रभागात गाेदावरी किनारी लावलेल्या नारळाच्या झाडांची पाहणी करण्यापर्यंत दाैरा वाढवून ठाकरे यांनी थेट गाडगे महाराज पुलापर्यंतच्या कामांची पाहणीही केली. या वेळी भाविकांनीही राज यांना बघण्यासाठी गर्दी केल्यावर त्यांनीही सर्वांना हात जाेडून अभिवादन केल्यावर जल्लाेषही झाला.