आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इक्विटी फंडाच्या परताव्यात घट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - म्युच्युअल फंडांच्या शेअरबाजार आधारित (इक्विटी) योजनांतून गत पाच वर्षांपासून असमाधानकारक परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार पैसा इतरत्र वळवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बॅँकेने 13 वेळा केलेली व्याज दरवाढ आणि शेअरबाजारात सातत्याने होत असलेली घसरण यामुळे इक्विटी फंडांना उत्तम परतावा देणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच गतवर्षभरात इक्विटी फंडांतून 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कमी झाली आहे.
जागतिक मंदीची झळ बसल्याने 2009-10ला शेअरबाजारात गुंतवणूकदारांनी रुची दाखविली नाही. त्या काळात तब्बल 60 ते 100 टक्के परतावा मिळविला. यावर्षी शेअर निर्देशांक आठ हजारांवरून 18 हजार अंकांवर पोहोचला. खूप चांगला परतावा मिळतोय म्हणून 2010-11मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर शेअरमध्ये गुंतवणूक केली. मात्र, या गुंतवणूकदारांना यावर्षी 24 टक्के तोटा सहन करावा लागला. 2011-12 मध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. या वर्षीही गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागला. यावर्षी कमोडिटीमध्ये लोकांनी पैसा कमावला. सोन्यात 40 टक्क्यांच्या आसपास तर कॉपर, क्रुड ऑइल, स्टील यातही परतावा मिळाला.
म्युच्युअल फंडांचे प्रकार - केवळ इक्विटी म्हणजे म्युच्युअल फंड नाही तर डेब्ट फंड, इक्विटी फंड, कमोडिटी फंड, एक्स्चेंज ट्रेडेड फंड हे प्रकार येतात.
गाठणार उच्चांक - येते सहा ते आठ महिने शेअरबाजार आधारित गुंतवणुकीकरिता चांगले नाहीत. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने करू शकता. 2014 पर्यंत निर्देशांक 36 हजारांचा टप्पा गाठेल. - मुकेश चोथाणी, अध्यक्ष, गुंतवणूकदार सल्लागार समिती, नाशिक