आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : निफाड, सटाण्याचे 42% मतदार ठरविणार अाज ‘मविप्र’चे भवितव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीसाठी शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांची अशी तयारी सुरु होती. - Divya Marathi
निवडणुकीसाठी शनिवारी दिवसभर कर्मचाऱ्यांची अशी तयारी सुरु होती.
नाशिक - मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेसाठी रविवारी (दि.१३) मतदान होत असून एकूण १० हजार १४७ मतदारांपैकी तब्बल हजार २६१ मतदार हे एकट्या निफाड अाणि सटाणा तालुक्यातील अाहेत. म्हणजेच या दाेनच तालुक्यात तब्बल ४२ टक्के मतदार असून संस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत हे मतदानच निर्णायक ठरणार अाहे. सकाळी ते दुपारी दरम्यान चाैदा केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार अाहे. सोमवारी (दि. १४) मतमोजणी होईल. 
 
निफाड अाणि सटाणा तालुक्यातील मतदारांवर लक्ष केंद्रित करून यंदाही निवडणुकीची व्यूहरचना करण्यात अाली. यात नेहमीप्रमाणे यंदाही निफाड तालुक्याचाच वरचष्मा असणार अाहे. संस्थेच्या जन्मदात्या निफाडमध्ये सुमारे हजार ८५२ मतदार अाहेत. म्हणजेच २८ टक्के मतदान एकट्या निफाड तालुक्यात अाहे. त्यामुळे हे मतदान निर्णायक ठरते. निफाडपाठाेपाठ सटाण्यात सर्वाधिक म्हणजे १४०९ इतके मतदान अाहे. कळवण, सटाणा, मालेगाव अाणि देवळा (कसमादे) या चारही तालुक्यातील सभासद एकमेकांना नात्यांनी जाेडले गेलेले असल्याने या तालुक्यांनाही महत्व प्राप्त झाले अाहे. देवळ्यात ५८७, कळवणमध्ये सुमारे ३१८ तर मालेगावमध्ये ७७० मतदार अाहेत. म्हणजेच कसमादेमध्ये ५ हजार ९३६ इतकी मते अाहेत. म्हणजेच कसमादेमध्ये ५९ टक्के मतदार अाहेत. म्हणूनच सत्तास्थापनेसाठी या तालुक्यातील सभासदांच्या मतांना महत्त्व प्राप्त झाले अाहे. कसमादे पाठाेपाठ दिंडोरी पेठ, चांदवड, नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणचा क्रमांक लागतो. मविप्रच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे सभासद सर्वच तालुक्यांतील उमेदवारांना मतदान करतात. त्यामुळे संबंधित उमेदवाराला आपल्या तालुक्यातून जरी कमी मतदान झाले तरी अन्य तालुक्यांतील मतदार त्याला तारू शकतात. 
 
अध्यक्ष अाणि सरचिटणीस पदासाठी काट्याची लढत : विधानसभानिवडणुकीप्रमाणे रंग भरलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राने गाजलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा साेनवणे यांचा सामना मालेगावचे तरुण संचालक डाॅ. तुषार शेवाळे यांच्याशी तर विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांची सरचिटणीसपदासाठीची लढत विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे यांच्याशी हाेणार अाहे. सभापतिपदासाठी माणिकराव बाेरस्ते यांचा दिलीप माेरे, उपसभापतिपदासाठी राघाे अाहिरे यांचा रवींद्र पगार यांच्याशी सामना हाेत अाहे. अर्थात उपसभापतिपदासाठी भगवंतराव बाेराडे, रामदास गायकवाड हे देखील उमेदवारी करीत अाहेत. याशिवाय नाशिक शहर ग्रामीणसह तालुका संचालकपदासाठीदेखील काट्याची लढत हाेत अाहे. २१ जागांसाठी एकूण ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
 
सेवक संचालकांतही अटीतटीची लढत : सेवकसंचालकांतही अटीतटीची लढत हाेणार अाहे. प्राथमिक अाणि माध्यमिक गटातून गुलाब भामरे अाणि नंदा साेनवणे , रामनाथ शेळके, रामराव बच्छाव, खंडू वारुंगसे, केशव शिरसाठ नंदू घाेटेकर हे उमेदवारी करीत अाहेत. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयीन गटातून डाॅ. अशाेक पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, संपतराव काळे उमेदवारी करीत अाहेत. 
 
मतदान केंद्रांत मराठेतर कर्मचारी : मविप्रच्यानिवडणुकीत मतदान केंद्रात अाणि मतमाेजणी केंद्रात मराठेतर कर्मचारी कार्यरत असतात. मविप्रत मराठा समाजातील बहुतांश कर्मचारी हे सभासदांचे अाप्तस्वकीय अाहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभावाने हेे कर्मचारी संबंधित उमेदवारांना झुकते माप देऊ शकतात वा मतदान केंद्रातही प्रचार करु शकतात. त्यामुळे मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य समाजातील कर्मचाऱ्यांची मतदान अाणि मतमाेजणी केंद्रात नियुक्ती करण्यात अाली अाहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, निफाड केंद्रावर कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू... 
बातम्या आणखी आहेत...