आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांसाठी ‘माझं ग्रंथालय’, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तुम्हालाकाय वाटतं, आम्ही वाचत नाही.. पण आम्हाला हवी ती पुस्तकं ज्यावेळी आम्हाला वाचाविशी वाटतात, तेव्हा मिळतच नाहीत, अशी ओरड करणारी वाचनप्रेमी पोरं काही कमी नाहीत. म्हणूनच आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने पुढचे पाऊल टाकत चिमुकल्यांसाठीही ‘माझं ग्रंथालय’ थेट त्यांच्या हाती पोहोचवले आहे. येत्या शनिवारी (दि. ७) या उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.

ग्रंथालय तुमच्या दारी उपक्रमाने सात समुद्र पार केले. त्यातूनच मग पुढे ‘माझं ग्रंथालय’ हा नवीन उपक्रमही जोमात यशस्वी झाला. पण, हे उपक्रम तसे मोठ्यांसाठीच होते. बाल वाचकांचं काय? तेदेखील पुस्तकं मागतात, त्यांनाही वाचायचे असते, असा विचार करून या उपक्रमांचे सर्वेसर्वा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांनी आता माझे ग्रंथालय बाल विभाग सुरू केला आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या पेट्या देण्यात येणार आहेत. या बाल विभागाची संपूर्ण जबाबदारी स्वाती गोरवाडकर यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे असा उपक्रम सुरू होणार हे कळताच तब्बल ३० जणांनी नोंदणीही केली आहे.

असा आहे उपक्रम
‘माझंग्रंथालय’ बाल विभागाच्या या पेट्यांमध्ये १० इंग्रजी आणि १५ मराठी पुस्तके असणार आहेत. दाेन महिन्यांसाठी ही पेटी एका कुटुंबाकडे असणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडे दुसरी पेटी देण्यात येऊन त्यांच्याकडील पेटी दुस-यांकडे फिरविण्यात येणार आहे.