आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nabard Works Issue, Investigation Of Corrupted PWD Engineer Satish Chikhalikar

नाबार्डची 18 कोटींची कामे संशयास्पद; चिखलीकरच्या 31 कामांची होणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याच्या कार्यकाळातील उत्तर उपविभागात 2012-13 मध्ये नाबार्डची 18 कोटी 39 लाख 67 हजार रुपयांची कामे झाली. त्यावर साडेसात कोटी रुपयांपर्यत खर्चही झाला असून आता या कामांच्या ठेक्याबरोबरच त्यांच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त होत आहे.

त्यातील बहुतांशी कामे ही रस्त्यांचीच आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांतील रस्त्यांची कामे असून सर्वच्या सर्व कामे ही रस्त्यांच्या दुरुस्तीचीच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या कामांची दुरुस्ती झाली की नाही, की केवळ बिले काढण्यात आली, असाही संशय व्यक्त होत आहे. सर्वाधिक कामे दिंडोरी आणि सुरगाणा या आदिवासी तालुक्यात झाली असून, दिंडोरीत 10 रस्त्यांची तर सुरगाण्यात नऊ रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वरमध्ये सात रस्त्यांची दुरुस्ती नाबार्ड योजनेअंतर्गत मार्च 2013 पर्यंत करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात अशा प्रकारच्या चार कामांचा समावेश आहे. या कामांचा 2013 पर्यंत खर्च जरी 7 कोटी 66 लाख 15 हजार असला तरीही त्यांचा ठेका मात्र चिखलीकरच्याच कार्यकाळात देण्यात आल्याने ही कामे कोणाला देण्यात आली, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.

बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने त्यास सहमती दर्शवत या कामांचा दर्जा आणि ठेकेदार यांची तपासणी नक्कीच केली जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघ यांच्या कार्यकाळात इतरही योजनेअंतर्गत झालेल्या कामांची तपासणी होणार आहे.