आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagapancami Festival,Latest News In Divya Marathi

नागराजाचे पूजन म्हणजे नागराजाचे जतन; नागपंचमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नागचौक मित्रमंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त पंचवटी येथील नाग मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी महिलांनी नागदेवतेचे पूजन केले. असंख्य भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला. नगरसेविका सुनीता शिंदे यांच्या हस्ते सकाळी मंदिरात महापूजा झाली. पंचवटी प्रभाग सभापती शालिनी पवार, नगरसेविका रंजना भानसी, उद्धव निमसे, पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे उपस्थित होते. नंदकुमार शिंदे, संतोष शिंदे, दिगंबर धुमाळ, कैलास जोशी, आप्पा लोखंडे, योगेश लोखंडे, दत्ता साळवे, स्वप्नील वसावे, सागर गरड आदींनी परिश्रम घेतले.
‘साप वाचवा’चा संदेश
सिडको येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये नागाची भव्य प्रतिकृती तयार करून त्याद्वारे ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’, ‘दूध सापांसाठी विष आहे’, ‘साप हा शत्रू नव्हे’ असे संदेश देण्यात आले. हरितसेना शिक्षक ए. आर. माळी यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती तयार केली होती. उपक्रमात इको क्लबचे विद्यार्थी गणेश समशेर, स्वप्नील कावले, करण मोरे, आकाश सुरडकर, पूर्वा चुंभळे, पूजा पाचरे, भारती आहिरे, सरिता शिरसाठ यांनी सहभाग घेतला. कलाशिक्षक डी. डी. आहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एन. व्ही. शेलार, पर्यवेक्षक ए. आर. माळी, डुमने, डी. के. पवार, विधाते, राजहंस, केंगे, भामरे उपस्थित होते.
मखमलाबादला उत्सव
मखमलाबादच्या तवली फाटा येथील डोंगरावर सालाबादप्रमाणे नागपंचमीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी नागदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सायंकाळी कुस्त्यांच्या दंगलीही पार पडल्या.