आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातींचे स्वतंत्र माेर्चे निघणे ही शाेकांतिकाच : नागराज मंजुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘काेपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर माेठ्या प्रमाणात माेर्चे निघत अाहेत. यापूर्वीदेखील विविध समाजांकडून असे माेर्चे निघत हाेते. प्रगत समाजात जातींचे असे स्वतंत्र माेर्चे निघणे ही शाेकांतिकाच अाहे. बलात्कार करणारा नराधम असताे. त्याला जात, धर्म नसताे. त्याच्या कृतीचा निषेध व्हायला हवा. ना की त्याच्या जातीचा,’ असे मत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रविवारी व्यक्त केले.
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर विचार संमेलनाच्या उद‌््घाटनप्रसंगी मंजुळे बाेलत हाेते. काेपर्डीतील पीडित मुलीला न्याय मिळणे अावश्यक अाहे, असे सांगत मंजुळे म्हणाले की, ‘हिंसा करता जगता अाले पाहिजे. अाजकाल महापुरुषांच्या पुतळा पूजनाला महत्त्व अाले अाहे. वास्तविक अशा प्रतीकांमध्ये अडकण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांची पूजा हाेणे अावश्यक अाहे.’
‘झिंगाट’नाचण्यापेक्षा क्लब बरा : मंजुळेम्हणाले, ‘इतरांना त्रास हाेणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. अाजकाल जयंती, सण, उत्सव जाेरदारपणे साजरे करण्याची पद्धत रूढ झाली अाहे. तुमच्या अानंदाचा दुसऱ्यांना त्रास हाेताे, याचा काेणी विचारच करीत नाही. जसे सिगारेट पिणाऱ्याला तत्कालीन अानंद हाेतही असेल. परंतु त्याच्या धुराचा त्रास मात्र इतर अनेकांना हाेत असताे. त्यामुळे सार्वजनिक मिरवणुकांमध्ये ‘झिंगाट’ नाचण्याची गरज नाही. त्या तुलनेत क्लब संस्कृती ही वाईट नाही. कारण क्लबमध्ये नाचणाऱ्यांचा त्रास समाजाला हाेत नाही.’
-
अारक्षणात जात नकाेच : अॅड. प्रकाश अांबेडकर
भारिपचे अध्यक्ष प्रकाश अांबेडकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ‘अारक्षणात वा विकासात जात असता कामा नये, तर त्यात व्यक्ती केंद्र मानून विकसित करणे बाबासाहेबांना अपेक्षित हाेते. समाजव्यवस्थेतून गाेंधळ उडत असल्याने नव्या पिढीसमाेर माेठा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. इंडियन की हिंदू माइंड अशा द्वंद्वात ताे अडकत अाहे. अशा परिस्थितीत त्याला वेगवेगळ्या संस्कृती, भाषा, व्यवस्था अापल्या वाटायला लागतात. धर्माला अवास्तव महत्त्व येत असल्यामुळे त्यात नवीन पिढी अडकत अाहे. खरे तर धर्माची चिकित्सा हाेत नाही, हे अपयशामागचे प्रमुख कारण अाहे. व्यक्तिस्वातंत्र्य असावे यात दुमत नाही. मात्र, हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी व्यवस्था काेणती यालाही महत्त्व अाहे. अाज केवळ खासगीकरण वा सरकारीकरणाचेच पर्याय समाेर ठेवले जात अाहेत. या बाबी सहजीवनाचा भाग हाेणार का याचाही विचार अाता व्हावा. तरुण पिढी ही स्वत:च्या विकासाच्या दृष्टीने माेठ्या प्रमाणात धावते. खरे तर राखीव जागा हे विकासाचे द्याेतक नाही, तर विकासाची खात्री देणारी व्यवस्था अाहे. म्हणून अांबेडकरी चळवळीतील सर्वात माेठे अाव्हान हेच अाहे की, अामचे विकासाचे प्रारूप कसे असेल, याची मांडणी करणे महत्त्वाचे अाहे. त्यात माणूस हा केंद्रबिंदू असायला हवा.’
बातम्या आणखी आहेत...