आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाद नाशिक ढोलचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भव्यदिव्य मूर्ती, आकर्षित सजावटीसोबतच गणेशोत्सवातील मिरवणुकीत पारंपरिक लेझीम व ढोल पथकांचे मोठे आकर्षण असते. त्यात नाशिक ढोलचा आवाज चांगलाच घुमतो. ढोल-ताशांचा हा नाद तरुणाईला आकर्षित करत असून, हा ताल शिकवण्यासाठी युवकांकडून सरावाचे धडे गिरवले जात आहेत.

नाशिक ढोलची परंपरा असलेल्या नाशिकमध्येही गणेशोत्सवात ढोल पथकांची संख्या वाढावी, त्यांना सराव करता यावा, यासाठी इंदिरानगर येथील अजय मित्रमंडळ युवकांना प्रशिक्षण देत आहे. जय मित्रमंडळाने गणेशोत्सवानिमित्त ढोल पथकाची स्थापना केली आहे. ४० जणांच्या या पथकात १० ते १५ विद्यार्थनिींचा सहभाग आहे. एक ताल-एक ढोल, एका तालात ढोल-ताशांचा नाद..अशा प्रकारे ढोल पथकांतील युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. रथचक्र परिसरातील अजय मित्रमंडळ हाॅलच्या मैदानावर १५ आॅगस्टपासून सायंकाळी ६ वाजता ढोल-ताशांचा सराव तालीम घेतली जात आहे. सुशील सारंगधर, राहुल उगावकर, अमित शिंगणे, प्रसाद भालेराव, भूषण काळे हे प्रशिक्षण देत असून, एक ढोल- एक ताल, नाशिक ढोल, पुणेरी ढोल, भांगडा यांसह वेगवेगळे लोकप्रिय प्रकार शिकवले जात आहे. २८ आॅगस्टपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, गणरायाच्या आगमनासाठी पालखी मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करत हे ढोल पथक सहभागी होणार आहे. मिरवणुकीतून नाशिक ढोलचा आवाज घुमणार आहे.
संस्कृतीचे संवर्धन
गणेशोत्सव तसेच इतर सणोत्सवात डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. डीजेचा कर्णकर्कश आवाजाचे अनेक दुष्परणिाम होत असल्याने पारंपरिकतेला महत्त्व देत ढोल -ताशांचा सराव करून घेतला जात आहे. सणोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करून संस्कृतीचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी हा छाेटासा प्रयत्न आम्ही मित्र मंडळाकडून करत आहोत.
सचिन कुलकर्णी, संस्थापक, अजय मित्रमंडळ