आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दमदार पाऊस, धरणे भरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्हात 72 तासांहून जास्त काळ सुरु असलेल्या संततधारेमुळे बहुतांश भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. नाशिकमध्ये पावसामुळे नव्याने सुरू असलेल्या बांधकामाची भिंत कोसळून मजुराचा मृत्यू झाला. तर त्र्यंबकनजीक तळवाडे-अंजनेरी तालुक्यात रस्ता ओलांडताना वाहून गेलेल्या सुनीता चव्हाण या युवतीचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये पाथर्डी फाटा येथे हरी विश्व प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सकाळी तेथे साचलेल्या पाण्याचा दबाव वाढून संरक्षण भिंती कोसळली. ती मजुरांनी राहण्यासाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने सात जण ढिगार्‍याखाली दबले. इतरांनी त्यांना बाहेर काढून खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पप्पू यादवचा रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. इतरांची प्रकृती सुधारत आहे. तर त्र्यंबकेश्वरनजीक तळवाडे अंजनेरी शिवारात रस्त्यावरून पाणी वहात असतानाही तो ओलांडण्याच्या प्रयत्नात सुनीता चव्हाण (17) व पूजा सोनवणे (17) या बुडाल्या. त्यातील पूजाला तेथील तिघांनी वाचविले. पण सुनीताचा मृत्यू झाला.
दमदार पावसामुळे धरणासाठय़ात वाढ होत आहे. गंगापूर धरण 70 तर दारणा 77 } भरले तर नांदूरमध्यमेश्वर पूर्ण भरले आहे. गोदावरीसह नद्यांना आलेले पाणी व दारणातून विसर्गामुळे 27 हजार 592 क्युसेक आणि नांदूरमध्यमेश्वरमधून 31,130 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघे शहर जलमय झाले आहे.

असून गोदावरी, नासर्डी व वालदेवी नद्यांना पूर आले आहेत. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत शहरात एकूण 80.1 मिलिमीटर पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातील जलसाठा 66 टक्क्यांपर्यंत तर दारणाचा 77 टक्क्यांवर गेला आहे.

त्रंबकेश्वर आणि आंबोली परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणात प्रतितासाला किमान 70 दशलक्ष घनफूट पाणी येत आहे. 31 जुलैपर्यंत या प्रकल्पात 76 टक्के पाणीसाठा, तर 15 ऑगस्टपर्यंत 87 टक्के आवश्यक आहे. आगामी दोन ते तीन दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर लवकरच या धरणांमधून मराठवाड्यासाठी विसर्ग करावा लागेल. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. गोदावरी नदीच्या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला तर अनेक दुकानांतही पाणी शिरले. दसक येथे नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या मंदिराचा चबुतरा पाण्याखाली गेला. वालदेवी नदीला उधाण आल्याने पात्रालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. दारणात पाणी वाढल्याने चेहडी स्मशानभूमीला पाणी लागले आहे, तर पळशे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने बुधवारी अलीकडेच अंत्यविधी करावे लागले.

छायाचित्र :गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या गोदावरीला पूर आला असून नदीपात्रातील हनुमानाच्या मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.