आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका अंदाजपत्रकावर स्थायी समितीची मोहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गतवर्षाच्या तुलनेत 480 कोटी रुपयांची वाढ असलेले व दीड कोटी रुपयांचे शिलकी असलेल्या 1556 कोटी रुपयांच्या महापालिकेच्या सन 2013-14 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला. गुरुवारी होणार्‍या बैठकीत चर्चा करून अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले जाईल.

स्थायी समितीची बैठकीनंतर सभापती उद्धव निमसे यांना नगरसचिवांनी अंदाजपत्रक सुपूर्द केले. त्यानंतर निमसे यांनी अंदाजपत्रकावर गुरुवारी स्थायी समितीची चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजेंडा काढून महासभा घेतली जाणार आहे.

28 फेब्रुवारीपूर्वी मंजुरीचा प्रयत्न : महासभेच्या मान्यतेनंतर अंदाजपत्रक अंतिम होते. महासभेवर स्थायीचे सभापती अंदाजपत्रक सादर करतात. स्थायी समिती सभापतिपदाची मुदत 27 फेब्रुवारी रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी महासभेवर अंदाजपत्रक ठेवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महासभा कधी होते यावर भवितव्य अवलंबून असल्यामुळे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळणार की नाही याविषयी निमसे यांनी साशंकता व्यक्त केली.

आयुक्तांची पाठराखण
अंदाजपत्रक आयुक्तांनीच सादर केले पाहिजे असा आग्रह धरणारे स्थायी समितीचे सभापती व सदस्यांनी प्रत्यक्षात सोमवारी आयुक्तांच्या अनुपस्थितीत नगरसचिवांकडून अंदाजपत्रक स्वीकारले. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर निमसे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांनीच काय ती भूमिका मांडावी असे उत्तर देत आयुक्तांची पाठराखण केली.