आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namandeva Dhasal Death, Loss Of Struggle,literature

ढसाळ यांच्‍या जाण्‍याने चळवळीसह साहित्याची मोठी हानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-स्यातूनवत:च्या प्रतिभेने मोठा झालेला, दलितांच्या अन्यायाला कविता व इतर साहित् वाचा फोडणारा आणि त्या सोडविण्यासाठी दलित पँथरची स्थापना करणारा लढवय्या पँथर म्हणून ओळखले जाणारे नामदेव ढसाळ बुधवारी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीची व साहित्याची सर्वच अंगांनी मोठी हानी झाल्याची भावना राजकीय नेते व साहित्यिकांनी व्यक्त केली.

मराठी कविता केली र्शीमंत

मराठी कवितेला भाषेच्या बाबतीत र्शीमंत करणारे असे नामदेव ढसाळ एकमेव कवी होते. दलित कवितांना जागतिक स्तरावर पोहोचविणारा असा हा कवी होता. खरं तर मराठी भाषेच्या वैभवाला जगात पोहोचविणार मोठा कवी आपल्यातून हरपला आहे. प्रकाश होळकर, कवी

महान कवी गेला

मराठी साहित्य आणि समीक्षेला नवी दृष्टी देणारा, पीडितांच्या दु:ख-भावनांना शब्दकळा बहाल करण्याची शक्ती असलेला महान कवी काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. -वामनराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ

सच्चा कार्यकर्ता पडद्याआड

दलित साहित्यात परिवर्तन क्रांती घडविलेला, स्वत:ला नेता न मानणारा आंबेडकरी चळवळीचा सच्चा कार्यकर्ता गेला आहे. त्यामुळे चळवळीची न भरून येणारी हानी झाली आहे. सुरेश नेटावटे, जिल्हाप्रमुख, दलित पँथर

चळवळीतील सूर्याचा अस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील धगधगत्या सूर्याचा अस्त झाला आहे. लढवय्या कवी, पँथर, महान विचारवंत आपल्यातून गेल्याने दलित आणि मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. प्रकाश पगारे, रिपब्लिकन सेना निमंत्रक

सक्रिय कार्यकर्ता हरपला

नामदेव ढसाळ यांच्या निधनाने चळवळीसह मराठी कवितेला सर्वसामान्यांपर्यंत नेणार्‍या कवीला आपण मुकलो आहोत. दीन-दलित, शोषित आणि वंचितांचा आवाज ढसाळांच्या जाण्याने क्षीण झाला आहे. शब्द आणि वाणी यांच्या माध्यमातून मागास समाजाला तेजाकडे नेणारा सक्रिय कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे. समीर भुजबळ, खासदार

चळवळीचे मोठे नुकसान

अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला, स्वत:च्या प्रगल्भतेने जगभर कीर्ती मिळविणारा, दलित साहित्याच्या माध्यामातून दलितांच्या व्यथा आणि वेदनांना वाचा फोडणारा हा सर्वस्पर्शी कवी होता. त्यांच्या निधनाने फुले-आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. जयंत जाधव, आमदार

वंचितांचा आशावाद गेला

नामदेव ढसाळ यांनी ‘गोलपिठा’ व अन्य साहित्य कृतींमधून उपेक्षित समाजाच्या समस्यांना वाचा फोडली. ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ या त्यांच्या काव्यसंग्रहातून, तसेच इतर साहित्य कृतींमधून त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन होते. चळवळीतील एक प्रगल्भ नेतृत्व, उपेक्षितांचा आशावाद आणि दलित साहित्यात महत्त्वाचे योगदान देणारा कवी हरपला आहे. छगन भुजबळ, पालकमंत्री

नामदेव ढसाळ यांना विविध स्तरांतील मान्यवरांकडून शब्दरुपी र्शद्धांजली

चळवळीतील कार्यकर्त्यांनादेखील त्यांच्या निधनामुळे एका सच्च्या कार्यकर्त्याला चळवळ मुकली असून, मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.