आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांसाठी लवकरच सुसज्ज अॅम्ब्युलन्ससह डायग्नोस्टिक सेंटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कॅन्सरसोबतच अन्य पॅथॉलॉजी रेडिअोलॉजीच्या तपासण्यांसाठी कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने स्वतंत्र सेंटर सुसज्ज अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच, आगामी काळात धुळे जळगाव येथे रेडिएशनसाठी स्वतंत्र सेंटर सुरू करण्याचाही मानस संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी व्यक्त केला.
पेठरोडवरील नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित एस.जी.एस. कॅन्सर हॉस्पिटलच्या सभागृहात गुरुवारी ही सभा बोलविण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. हुकूमचंद बागमार यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सभा सुरू झाली. भंडारी पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडतील असे हेल्थ पॅकेजेस तयार केले जात आहेत.

संस्थेचे सचिव शशिकांत पारख यांनी संस्थेच्या वर्षभराचा आर्थिक आढावा घेतला. तसेच, आगामी काळात हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या सुविधा सुधारणा, तसेच यापुढे करावयाच्या सुधारणांबाबतची योजना मांडली. निदान चाचण्या अत्यंत कमी दरांत उपलब्ध केल्या जात असून, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेप्रसंगी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, सदस्य सभासद तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले.

भविष्यात वैद्यकीय सेवेतील गरज संधी लक्षात घेता रुग्णालयात लवकरच पॅरामेडिकल कोर्सेस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शशिकांत पारख यांनी दिली. नाशिकसह विभागातील अन्य जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनादेखील या अभ्यासक्रमाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...