आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याद्यांमध्ये घोळ, मतदारांचे नाव सापडेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मतदारयादीत अनेक चुकांसह नावात झालेल्या गोंधळ फेरफारमुळे सोमवारी (दि.२०) मतदारांचा यादीत नावे शोधण्यात मोठा गोंधळ होत होता. तर अनेक प्रभागातील नावे इतर प्रभागात आल्याने अनेकांचे नावेच यादीतून गायब झाल्याने मतदारांमध्ये असंतोष आहे. तर या गोंधळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. 
 
दोन वर्षांपूर्वी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच कारणामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. मधल्या काळात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. मात्र, तसे करता पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत अशाच चुका करण्यात आल्याने या मतदारांनाही वंचित राहावे लागणार आहे.शहरातील अनेक मतदारांचे नावे यादीत नसल्याचे तसेच दुसऱ्या प्रभागात गेल्याचे चित्र आहे. मतदार यादीत झालेल्या गोंधळामुळे मंगळवारी(दि.२१) मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...