आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना ‘कामगार कल्याण’चा दूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कामगारांची सांस्कृतिक जडणघडण व्हावी, कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना एक उंची प्राप्त व्हावी कामगारांनाही या उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी होता यावे, यासाठी अभिनेता नाना पाटेकरने या मंडळाचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचे मान्य केल्याचे कामगार उपायुक्त राजाराम जाधव यांनी जाहीर केले. मंडळाच्या ६२व्या प्राथमिक नाट्य महोत्सव स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जाधव शुक्रवारी बोलत होते.

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्य सूर्यकांत देसाई, नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सहायक कामगार आयुक्त संजय धुमाळ यांनी कालिदासमधील कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन केले. अलका कुबल, रोहिणी हट्टंगडी यांसारखे कलाकारही याच स्पर्धेतून पुढे आले आहेत. असे अनेक कलाकार तयार व्हावे हाच कामगार मंडळाचा उद्देश असून, त्यासाठी आता नानाही काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

^६२ वर्षांपासून कामगार कल्याण मंडळाच्या नाटकांच्या स्पर्धा होत आहेत. मात्र, आजही त्याच्या बक्षिसाच्या तसेच इतर रकमेत वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक संघांना या स्पर्धेत सहभागी होणे परवडत नाही. नाशिक केंद्राला जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार येथीलही संघ येऊ इच्छितात. मात्र, केवळ आर्थिक कारणास्तव या स्पर्धेसाठी ही मंडळे येत नाहीत. सुनीलढगे, कार्यवाह,नाट्य परिषद, नाशिक शाखा

^मी सदस्य झाल्यापासून जवळपास १०० संहिता वाचल्या असतील. अनेक घटनांचा लेखकांनी त्यात ऊहापोह केला आहे. त्यांचे विचारही उत्तम आहेत, पण मी वाचलेल्या संहितांमध्ये कामगार, शेतकरी, त्यांच्या आत्महत्या अशा दाहक घटनांवर एकाही लेखकाला लिहावेसे वाटत नाही, याची खंत वाटते. लेखकांनी लोकांच्या भावना नाटकातून उरविल्या पाहिजेत, अशी नाटके रंगभूमीवर आली पाहिजेत. सूर्यकांत देशपांडे, सदस्य,रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ '